आपण सर्वांनी सैराट बघितला तसेच त्यातील आरची आणि परश्याची जी भूमिका होती तिने अक्षरशः सर्वांना वेड केलं.
परंतु पूर्ण फिल्म मध्ये आरची आणि परशा यांची तुलना करायची म्हंटली तर प्रेक्षकांनी आर्चीच्या अभिनयाला किव्हा कॅरॅक्टर ला भरभरून प्रेम दिल.
सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू हिने प्रेक्षकांची मन अशा प्रकारे जिंकली आहे कि ती रातोरात सुपरस्टार झाली.
तसेच रिंकू कागर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटात सुद्धा तिच्या अभिनयाचं पोटभरून कौतुक झालं.
रिंकू राजगुरू कलर्स मराठी वरील एका कार्यक्रमात उपस्तित झाली होती. ‘एकदम कडक’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे.
तर या कार्यक्रम दरम्यान तिला एक प्रश्न विचारला गेला होता कि, तुला बॉलिवूड च्या कोणत्याही सुपरस्टार बरोबर देट वर जाण्याची संधी मिळाली तर तू कुणासोबत जाण पसंत करशील.
या प्रश्नानंतर रिंकूने क्षणाचाही विलंब न लावता विकी कौशल या कलाकाराचे नाव घेतले. आणि यावरून असं समजत कि रिंकू विकी ची एक मोठी चाहती आहे.
विकी कौशल ला तर आपण ओळखतच असाल, विकीने नेटफ्लिक्स वर ‘लस्ट स्टोरीज’ चा सिरीज मध्ये काम केलेलं आहे तसेच ,
‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटामुळे विकीला एक मोठा स्टारडम मिळाला आहे.