बच्चन कुटुंब बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध कुटुंब आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय या घराची सून झाली आहे. या कुटुंबाबद्दल लोकांचा वेगळाच आदर आहे आणि या कुटुंबातील सदस्य एकमेकांवर पण खूप प्रेम करतात.
कधीही संपूर्ण बच्चन कुटुंब पार्टी किंवा कार्यक्रमात एकत्र दिसतात. अमिताभ बच्चन जया बच्चन अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन कुटुंबातील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. पण अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताने आपली ओळख फिल्म इंडस्ट्रीपेक्षा वेगळी केली आहे.
काही वर्षांपूर्वी श्वेताने सांगितले होते की तिलाही प्रत्येक स्टार किडप्रमाणे अभिनेत्री व्हायचं आहे. परंतु चित्रपटसृष्टीत तिने यावे अशी तिच्या वडिलांची इच्छा नव्हती. श्वेता बच्चन ने फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर केले. काही काळापूर्वी तिने आपले दुकानही सुरू केले.
जरी श्वेताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला नसेल. पण प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात ती आपल्या कुटुंबातील सदस्यांसह दिसते. श्वेताने सांगितले की तिचे जितके तिच्या आईवडील व भावाशी जवळीक आहे तितकीच तिची ऐश्वर्याशीही तिचे खूप चांगले सं बंध आहेत.
काही काळापूर्वी श्वेताने एक विधान केले होते त्यात तिने ऐश्वर्याची कोणती सवय अजिबात पसंत नसल्याचे सांगितले. काही काळापूर्वीच श्वेता करण जोहरच्या शो कॉफी विथ करणसह आपल्या भावा बरोबर आली होती जिथे तिने अनेक खुलासे केले.
करण जोहरने श्वेता बच्चन हिला ऐश्वर्या रायशी संबंधित प्रश्न विचारले. रैपिड फायर राउंड फेरीत करणने श्वेताला विचारले की तिला ऐश्वर्याची कोणती सवय आवडते आणि कोणती सवय खूप निरुपयोगी दिसते.
तर श्वेताने सांगितले की ऐश्वर्या एक चांगली आई आणि सेल्फ मेड स्ट्रॉंग स्त्री आहे मला ती खूप आवडते. पण ती कधीही मेसेजेस आणि फोन ला रिप्लाई देत नाही. मला तिची ही सवय अजिबात आवडत नाही.
अमिताभ यांची कन्या श्वेता नंदा यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. श्वेता नंदा या ग्लॅमर जगतापासून तशी दूर असते. त्यातच तीच लग्न होऊन जवळपास २२ वर्षे झाली आहेत. त्यामुळं तिच्या लग्नाच्या फोटांविषयी खूपच चर्चा पाहायला मिळत आहे.
श्वेता बच्चन पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येणार आहे. श्वेता 44 व्या वर्षी ग्लॅमरस इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. श्वेता कोणत्या सिनेमात नव्हे तर एका जाहिरातीत दिसणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत झळकणार आहेत. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच त्याबाबतचा फोटो शेअर केला.
कल्याण ज्वेलर्सची ही जाहिरात जुलैमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचं शूटिंग सोमवारी पूर्ण झालं. या जाहिरातीत अमिताभ बच्चन एका ज्येष्ठ नागरिकाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर श्वेताने सलवार-कमीज परिधान केल्याचं दिसतं.
अमिताभ बच्चन हे 2012 पासून कल्याण ज्वेलर्स ची जाहिरात करतात. पत्नी जया बच्चनसोबतही अमिताभ बच्चन या जाहिरातीत दिसले होते. श्वेता बच्चन नंदा 44 व्या वर्षी पदार्पण करत असल्याने आश्चर्य आणि उत्सुकता व्यक्त होत आहे.
भाऊ अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये अनेक वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र श्वेता बच्चन बॉलिवूडपासून लांबच राहिली. श्वेता बच्चन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतंच अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात श्वेता ने केलेल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.