वास्तूशास्त्रामध्ये मनी प्लांटला खूप भाग्यशाली मानले जाते. मनी प्लांट घरात राहिल्यास लाभ मिळतो आणि घरामध्ये शांतता टिकून राहते. घराशिवाय ऑफिसमध्येहि मनी प्लांट ठेवले जाते.
मनी प्लांट आसपास राहिल्यास घरामध्ये एक सकारात्मक उर्जा बनून राहते. परंतु अनेक लोकांना माहित नसते कि मनी प्लांट घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवावे. खरे तर मनी प्लांट घरामध्ये चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास घरातील होणाऱ्या चांगल्या गोष्टीवर नकारात्मक प्रभाव पडतो. मनी प्लांट घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवावे आणि आणि त्याचे घरासाठी कोणते फायदे आहेत.?
घरामध्ये मनी प्लांट ठेवण्याचे फायदे
घरामध्ये मनी प्लांट ठेवल्याने घरामध्ये पैसा, शांती, सुख आणि समृद्धी टिकून राहते आणि कधीच संपत्तीला हानी पोहोचत नाही. इतकेच नाही तर मनी प्लांट प्रदूषित हवा शुद्ध करते आणि आपल्याला शुद्ध हवा मिळते.
या दिशेला ठेवावे
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट ईशान्य कोणामध्ये किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. या दिशेला मनी प्लांट ठेवल्यास घरामध्ये क्लेश आणि आर्थिक तंगी येते आणि आपले आयुष्य तणावग्रस्त होते.
वास्तुशास्त्रानुसार हे प्लांट दक्षिण-पूर्व दिशेला लावल्यास त्याचे खूप लाभ मिळतात. खरेतर हि दिशा शुक्राची दिशा मानली जाते आणि वेल किंवा किंवा फांद्यांच्या वनस्पतीचा स्वामी शुक्र मानला जातो.
घरामध्ये लावावे
बरेच लोक हे झाड घराच्या बाहेर लावतात. वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या आतमध्ये लावल्यास जास्त लाभकारी असते आणि ते घराच्या अशा कोपऱ्यामध्ये ठेवावे जिथे यावर सूर्यप्रकाश चांगला पडला पाहिजे.
जमिनीला स्पर्श नाही केले पाहिजे
मनी प्लांटचा वेल लावतेवेळी हि गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी कि मनी प्लांटचा वेळ जमिनीवर पसरू नये. मनी प्लांटचा वेल जमिनीच्या ऐवजी भिंतीच्या मदतीने नेहमी वरच्या दिशेला वाढू द्यावे.
ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांटचा वेल जर जमिनीला स्पर्श करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. याशिवाय घरामध्ये कधीही सुखलेले आणि पिवळे पडलेले मनी प्लांट ठेवू नये. हे खूप अशुभ मानले जाते.
या दिवशी घेऊन यावे हे झाड
बुधवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये मनी प्लांट आणून ठेवावे. या दिवशी रेवती नक्षत्रादरम्यान या झाडाला घरामध्ये आणल्यास व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि घरामध्ये शांती टिकून राहते. बहुतेकदा विवाहित जोडप्यांमध्ये नेहमी वाद होत असतात हे वाद कमी करण्यासाठी दिल च्या आकाराचे मनी प्लांट घरामधील आपल्या खोलीमध्ये ठेवावे.
या दिवशी देऊ नये पाणी
मनी प्लांटला पाणी देणे खूप जरुरीचे असते. पाणी दिले नाही तर हे झाड सुकून जाते आणि त्याची पाने झाडू लागतात. यासाठी रविवारच्या दिवशी सोडून इतर दिवशी या झाडाला पाणी जरूर द्यावे. त्याशिवाय ज्यावेळी तुम्ही या झाडाला पाणी देता त्यावेळी त्या पाण्यामध्ये एक चमचा दुध जरूर घालावे.