सर्वसामान्यपणे शारीरिक सं बंध ठेवताना गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वात सोपा सुरक्षित मार्ग म्हणजे कंडोमचा वापर करने. बाजारामध्ये अनेक प्रकारचे अनेक ब्रँण्डचे कं डोम आपल्या पाहायला मिळतात.
पण सध्या एका वेगळ्याच कंडोमची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. एक नवीन कंडोम प्रचलित झाला आहे. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
हे कंडोम सर्वात बारीक कंडोम म्हणून ओळखले जात आहे आणि त्याचबरोबर सर्वात सुरक्षित कंडोम म्हणूनही याचा वापर केला जात आहे. चला तर जाणून घेऊनयात या जपानी कंडोमच्या खास बनावटी बद्दल.
जपानी कंडोम हे जपानच्या काही संशोधकांनी शोधून काढले असून काही वर्षांपूर्वी याची निर्मिती करण्यात आली होती. विशेष म्हणजे हे कंडोम ज्यावेळी तयार करण्यात आले त्यावेळी हे जगातील सर्वात पातळ कंडोम असल्याचा दावा संशोधकांद्वारे करण्यात आला.
सध्या बाजारामध्ये जो कंडोम उपलब्ध आहे त्याची जाडी ०.०६ mm इंतकी आहे तर या जपानी कंडोमची जाडी हि ०.०३८ mm इतकी आहे. त्यामुळे या कंडोमला ००३ असे देखील ओळखले जाते.
सुरक्षेच्या दृष्टीने हे कंडोम खूपच महत्वाचे समजले जाते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार शारीरिक संबंधांच्या दरम्यान या कंडोमचा वापर केल्यास कसल्याही प्रकारचा धोका किंवा समस्या निर्माण होत नाहीत.
त्याचबरोबर याचा वापर करून गर्भधारणासुद्धा टाळता येते. या कंडोमची विशेषता हि आहे कि, हे कंडोम खूपच पातळ आहे आणि शरीरसंबंधादरम्यान याचा अधिक चांगल्याप्रकारे करू शकता.
पातळ जाडीचे कंडोम विकत घेताना विशेष गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक असते. सर्वप्रथम हे कंडोम कोणत्या प्रकारच्या मटेरिअल पासून तयार करण्यात आलेले आहे ते जाणून घ्या.
काही कंडोम हे लॅटेक्सपासून तर काही कंडोम हे नॉन लॅटेक्सपासून बनवलेले असतात. तर काही पॉलीयूरिथेन आणि पॉलीआइसोप्रीन असेही असतात. काही लोकांना लॅटेक्सची एलर्जी असते अशा लोकांनी कंडोम कितीही पातळ असला तरी त्याचा वापर करू नये.
अनेक प्रकारचे पातळ कंडोम हे बेस्ट लुब्रिकेंट्ससोबतच येतात. अशा कंडोमचा वापर करण्यापेक्षा सिलिकॉन बेसड् असलेले कंडोम वापरणे जास्त चांगले. अनेक लोकांची अशी धारणा आहे कि कंडोम जितके पातळ आहे तितके ते लवकर फाटते त्यामुळे ते खूप जोखमीचे ठरू शकते. पण जपानी कंडोम हे अनेक चाचण्या घेऊन तयार करण्यात आले आहे त्यामुळे ते वापरणे खूप सुरक्षित आहे.