प्रेम झाले आणि एक मुलगीही झाली पण या कारणामुळे या मुलाने नाही केले लग्न, हि आहे लक्ष्मीची खरी कहाणी
{"effects_tried":0,"photos_added":0,"origin":"unknown","total_effects_actions":0,"remix_data":["add_photo_directory"],"tools_used":{"tilt_shift":0,"resize":0,"adjust":0,"curves":0,"motion":0,"perspective":0,"clone":0,"crop":0,"flip_rotate":0,"selection":0,"enhance":0,"free_crop":0,"shape_crop":0,"stretch":0},"total_draw_actions":0,"total_editor_actions":{"border":0,"frame":0,"mask":0,"text":0,"lensflare":0,"clipart":0,"square_fit":0,"shape_mask":0,"callout":0},"source_sid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1579663830700","total_editor_time":0,"total_draw_time":0,"effects_applied":0,"uid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1579663069001","total_effects_time":0,"brushes_used":0,"height":642,"layers_used":0,"width":1242,"subsource":"done_button"}

प्रेम झाले आणि एक मुलगीही झाली पण या कारणामुळे या मुलाने नाही केले लग्न, हि आहे लक्ष्मीची खरी कहाणी

लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनवला गेला आहे आणि या चित्रपटाचे नाव आहे छपाक. जेव्हापासून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हापासून लक्ष्मी अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे.

प्रत्येकाला लक्ष्मी अग्रवालबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे, सर्व लोकांना लक्ष्मीच्या जीवनाची खरी कहाणी जाणून घ्यायची इच्छा आहे.

तुम्हा सर्वाना हे तर चांगलेच माहिती असेल कि एका मुलाने लक्ष्मीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा पूर्णपणे बिघडवला होता. ज्यानंतर लक्ष्मीने केस लढली आणि ती जिंकलीही.

केस जिंकण्याबरोबरच लक्ष्मी अग्रवाल पूर्ण हिम्मतीने आणि धैर्याने आयुष्य जगत आहे. यादरम्यान लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यामध्ये एका मुलाने प्रवेश केला. या मुलाचे नाव होते आलोक दीक्षित.

आलोक दीक्षित लक्ष्मी अग्रवालसारख्या अ‍ॅ सिड अटॅक पीडित मुलींच्या मदतीसाठी काम करत होता आणि या संदर्भात तो अनेकदा लक्ष्मीला भेटत असे. एकमेकांना भेटता-भेटता या दोघांना एकमेकांवर कधी प्रेम झाले कळलेच नाही यानंतर आलोक आणि लक्ष्मी एकत्र लिव्ह-इनमध्ये राहू लागले.

लक्ष्मी आणि आलोक जवळपास चार वर्षे एकत्र लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. ते ज्यावेळी एकत्र राहत होते त्यावेळी लक्ष्मीने एक गोंडस आणि सुंदर मुलीला जन्म दिला. आजच्या काळामध्ये लक्ष्मी अग्रवाल एक सिंगल मदर आहे.

लग्नासंबंधी प्रश्न विचारले गेल्यास लक्ष्मी अग्रवाल म्हणते कि, ती आलोकसोबत फक्त लिव्ह-इनमध्ये राहत होती आणि जेव्हा आलोकला असे वाटले कि आता आपल्याला वेगळे झाले पाहिजे तेव्हा त्याने माझी साथ सोडली आणि तो वेगळा झाला.

लक्ष्मी अग्रवालला आपल्या आयुष्यामध्ये जास्त काही मिळवण्याची इच्छा नाही आणि तिच्याजवळ जेवढे काही त्यावर ती आनंदी आहे.

आजच्या काळामध्ये लक्ष्मी अग्रवाल आपल्या मुलीसोबत खूप खुश आहे आणि एक चांगले आयुष्य व्यतीत करत आहे. पण आयुष्याने तिला असे काही घाव दिले आहे जे कधीही भरून नाही येऊ शकत.

पण आता आपला भूतकाळ सोडून वर्तमान काळ जगण्याची वेळ आहे जी लक्ष्मी खूपच चांगल्या प्रकारे जगत आहे आणि हि तिची कहाणीसुद्धा आहे. लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित चित्रपट छपाकमध्ये लक्ष्मी अग्रवालची भूमिका बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोणने साकारली आहे.

लक्ष्मी अग्रवाल हि एक अ‍ॅसिड अटॅक सर्वाइवर आहे. लक्ष्मी दिल्लीची रहिवाशी असून तिचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. जेव्हा लक्ष्मी १५ वर्षांची होती तेव्हा तिने गायक होण्याचे स्वप्न पाहिले होते.

३२ वर्षांचा एक मुलगा नदीम खान लक्ष्मीसोबत लग्न करू इच्छित होता पण लक्ष्मीला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. नदीम नेहमी लक्ष्मीचा पाठलाग करत असे. लक्ष्मीने अनेक वेळा आपल्या पाठीमागे येण्यास त्याला मनाई केली पण तो ऐकला नाही.

२००५ मध्ये लक्ष्मी जेव्हा खान मार्केटमध्ये एका पुस्तकाच्या दुकानाकडे जास्त होती तेव्हा नदीमने लक्ष्मीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकले. त्यावेळी लक्ष्मी तिथेच रस्त्यावर पडली. जेव्हा लक्ष्मी वेदनेने तडफडत होती तेव्हा एका टॅक्सी ड्राइवरने लक्ष्मीला जवळच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

About admin

Check Also

मेरी पत्नी को खरीदें, पति ने फेसबुक पर किया पोस्ट, जानिए आगे क्या हुआ?

मेरी पत्नी को खरीदें, पति ने फेसबुक पर किया पोस्ट, जानिए आगे क्या हुआ?

दुनिया में कई अजीबो-गरीब लोग रहते हैं। कभी-कभी कुछ लोग ऐसी चीजे करते हैं जिसकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *