पैसे कमवणे जितके जरुरी आहे तितकेच जरुरी असते ते सांभाळून ठेवणे. होय जर तुम्हाला पैसा ठेवण्याची योग्य पद्धत माहिती असेल तर तुमच्या घरामध्ये येणारी बरकत कोणीही रोखू शकत नाही.
बरेच लोक भरपूर पैसा कमवतात परंतु तो व्यवस्थित ठेवण्यात असमर्थ होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पैसे योग्य ठिकाणी ठेवणे खूप आवश्यक असते. यामुळे फक्त आपले उत्पन्नच वाढत नाही तर घरामध्ये पैसा टिकून राहतो. तर चला जाणून घेऊयात आजच्या या लेखामध्ये काय खास आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार घरामध्ये पैसा ठेवला पाहिजे. वास्तविक कोणत्या दिशेला पैसे ठेवल्याने तुमची बरकत होईल याचे ज्ञान असणे अत्यंत जरुरी आहे.
अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशी अनुसार घरातील दिशेला पैसे ठेवले पाहिजेत जेणेकरून त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.
तर आज तुम्हाला राशीनुसार घराच्या कोणत्या दिशेमध्ये पैसे ठेवले पाहिजेत याच्याबद्दल सांगणार आहोत, म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीमातेची कृपा नेहमी राहील.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांनी घराच्या पश्चिम दिशेला पैसे ठेवले पाहिजेत. हे लक्षात ठेवा कि आपण जिथे पैसे ठेवले आहेत तिथे लोखंडाची एक रिंग जरूर ठेवावी. यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहील. याशिवाय मेष राशींच्या लोकांनी घरामध्ये बरकत ठेवण्यासाठी संध्याकाळी देवाण-घेवाण केली पाहिजे. यामुळे त्यांच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल.
वृश्चिक राशी
या राशीच्या लोकांनी घरातील पूर्व दिशेला संपत्ती ठेवली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे कि धनाजवळ एखादी चांदीची किंवा सोन्याची वस्तू ठेवली पाहिजे यामुळे माता लक्ष्मीची कृपा बरसत राहील आणि घरामध्ये कधीही धनाची कमी होणार नाही. या लोकांनी संध्याकाळी व्यवहार टाळला पाहिजे.
मिथुन राशी
या राशीच्या लोकांनी उत्तर दिशेला आपले धन ठेवले पाहिजे, यामुळे यांच्या घरामध्ये बरकत होईल. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवावे कि धनाच्या ठिकाणी तांब्याची वस्तू जरूर ठेवावी. त्याचबरोबर या लोकांनी मंगळवारी व्यवहार करणे टाळावे.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांनी धन पूर्व-दक्षिण दिशेला ठेवले पाहिजे आणि त्याचबरोबर चांदीची एखादी वस्तूसुद्धा तिथे ठेवावी. असे केल्यास यांचे भंडार कधीही खाली होणार नाही. आणि याच्यावर ध्यान दिले पाहिजे कि आपली तिजोरी कधीही खाली होऊ नये, भले त्यामध्ये एक रुपया का असेना.
सिंह राशी
या राशीच्या लोकांनी घराच्या पूर्व दिशेला धन ठेवले पाहिजे आणि त्याबरोबर कोणतीही कास्यची वस्तू तिथे ठेवली पाहिजे आणि धनाच्या ठिकाणी सोन्याची वस्तू ठेवणे टाळावे. अन्यथा ते अशुभ होऊ शकते आणि आपल्या घरामध्ये पैसे टिकून राहणार नाहीत.
कन्या राशी
या राशीच्या लोकांनी घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला आपले धन ठेवले पाहिजे. त्याचबरोबर या लोकांनी दुपारच्या वेळी देवाण घेवाण टाळावी. याशिवाय धनाच्या ठिकाणी यांनी एखादी चांदीची वस्तू जरूर ठेवावी.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांनी दक्षिण दिशेला आपले धन ठेवले पाहिजे. याशिवाय या लोकांनी एका लाल कपड्यामध्ये तांबे बांधून त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे कि, त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकाश पडला पाहिजे.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांनी आपल्या घरामध्ये दक्षिण-पूर्व दिशेला आपले धन ठेवले पाहिजे त्याचबरोबर पांढऱ्या कपड्यामध्ये चांदी गुंडाळून त्या ठिकाणी ठेवावी यामुळे घरामध्ये नेहमी बरकत राहील.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांनी उत्तर दिशेला आपले धन ठेवले पाहिजे त्याचबरोबर धनाच्या स्थानावर कुबेरची प्रतिमा देखील ठेवावी. हे लक्षात ठेवले पाहिजे कि त्या ठिकाणी सोने किंवा चांदीची कोणतीही वस्तू असून नये.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांनी पूर्व दिशेला आपले धन ठेवावे, याशिवाय पिवळ्या कपड्यामध्ये पितळ बांधून त्या जागेवर ठेवावे. आणि सकाळी सकाळी देवाण घेवाण टाळावी.
मीन राशी
या राशीच्या लोकांनी घराच्या पश्चिम दिशेला धन ठेवले पाहिजे. याशिवाय त्या ठिकाणी एखादी लोखंडाची वस्तू जरूर ठेवावी आणि धनाचा अनावश्यक खर्च करू नये.