बॉलिवूड मध्ये कोण कधी काय विधान करेल काही सांगता येत नाही. कधी कधी भावनेच्या भरात किव्हा गोंधळात येऊन सेलेब्रिटी काय काय बोलून उठताट त्यांनाच कळत नाही.
नुकताच सैफ अली खान ने एक विधान केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी भारत म्हणजेच आपल्या देशाच्या नावावर प्रश्न उठवला आहे.
सैफ अली खानने नुकतेच असे विधान केले कि त्याबद्दल त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.
एका मुलाखतीत ते म्हणाले की ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी कदाचित भारताची संकल्पना नव्हती.
हे विधान केल्यावर सैफवर जोरदार हल्ला केला जात असून कंगना रनौतनेही यात उडी घेतली आहे.
सैफच्या वक्तव्यावर कंगनाने जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कंगना म्हणाली की सैफ यांच्यानुसार ‘भारत’ नसते तर ‘महाभारत’ काय आहे. कंगना बोलली महाभारत म्हणजे काय?
वेद व्यासांनी काय लिहिले? महाभारतात श्रीकृष्णाने म्हटले आहे की त्यावेळी देखील भारत हे नाव होते.
सुरुवातीला राजे-महाराजे जरी वेगळे असले तरी त्यांनी त्याच्या नावासाठी संघर्ष केला ज्याला भारत म्हणतात.
24 जानेवारीला रिलीज होत असलेल्या पंगाच्या प्रमोशन दरम्यान कंगनाने हे सांगितले.
अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात कंगना कबड्डीपटूच्या भूमिकेत आहे. रिचा चड्ढा, जस्सी गिल आणि नीना गुप्ता यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.