अबबब ! हार्दिक पंड्याच्या हातातले घड्याळ आणि वापरत असलेल्या गाडीची किंमत बघाल तर, डोकं चक्रावून जाईल तुमचं...
{"effects_tried":0,"photos_added":0,"origin":"unknown","total_effects_actions":0,"remix_data":["add_sticker","add_photo_directory"],"tools_used":{"tilt_shift":0,"resize":0,"adjust":0,"curves":0,"motion":0,"perspective":0,"clone":0,"crop":0,"enhance":0,"selection":0,"free_crop":0,"flip_rotate":0,"shape_crop":0,"stretch":0},"total_draw_actions":0,"total_editor_actions":{"border":0,"frame":0,"mask":0,"lensflare":0,"clipart":0,"text":0,"square_fit":0,"shape_mask":0,"callout":0},"total_editor_time":92,"brushes_used":0,"total_draw_time":0,"effects_applied":0,"uid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1580013484274","total_effects_time":0,"source_sid":"B91754B1-3A38-4729-81E3-ED5BA23DB098_1580013487532","sources":["313817360223211"],"layers_used":2,"width":1242,"height":648,"subsource":"done_button"}

अबबब ! हार्दिक पंड्याच्या हातातले घड्याळ आणि वापरत असलेल्या गाडीची किंमत बघाल तर, डोकं चक्रावून जाईल तुमचं…

हार्दिक पंड्या हा तर सर्वांचाच लाडका खेळाडू आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळाने त्याने सर्वांचेच मन जिंकलेले आहेत. आणि आता सध्या पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला अष्टपैलू क्रिकेटपटू आपला लाडका हार्दिक पंड्या सध्या त्याच्या लाइफस्टाइल आणि खाजगी जीवनामुळे फार चर्चेत आहे.

पाठीच्या दुखण्याचा त्रास असल्याने हार्दिक काही दिवस संघाबाहेर आहे.

हार्दिक पंड्या ने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री तसेच मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. आणि त्यानंतर सोशल मीडियावर हार्दिक चर्चेचा विषय बनला आहे.

हार्दिक पंड्या हा स्वतःच्या स्टाईल बद्दल फारच म्हणजे खूप पैसे खर्च करतो असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. आणि त्यामुळे त्याच्या स्टाईल वर नेटकरी नेहमीच फिदा असतात.

सोशल मीडियावर नेहमीच त्याच्या स्टाइलची चर्चा होत असते. महत्वाची गोष्ट ती म्हणजे अशी कि, हार्दिकला महागड्या वस्तू वापरण्याचा शॉक आहे हे नेहमीच समोर आले आहे.

बऱ्याचवेळा हार्दिक महागडे शूज, गॉगल्स, स्नीकर आणि जॅकेटमध्ये दिसतो. नेमकाच एअरपोर्टवर पुन्हा एकदा हार्दिकचा असा लूक दिसून आला ज्याने सर्वांचे मन वेधून घेतलं. आणि त्याने घातलेल्या महागड्या वस्तूची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

हार्दिक पांड्यानं मध्यंतरी सर्जरीनंतर दवाखान्यातून सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये त्याच्या हातात असलेल्या त्या घडाळाची किंमत टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास ८० लाख रूपये आहे.

तसेच नुकताच काही दिवसांपूर्वीच एअरपोर्टवरील लूकमध्ये हार्दिकनं हातामध्ये घातलेल्या घड्याळाची किंमत जवळपास तब्बल एक कोटी रूपये आहे. हार्दिक पंड्या ने त्या दिवशी पाटेक फिलिपची पर्पेचुअल कॅलेंडर 5740/1G हे घड्याळ घातलं होतं.

याची साधारण किंमत ८५ लाख रुपये इतकी आहे. भारतात हे घड्याळ उपलब्ध नसल्यामुळे त्याची किंमत जवळपास एक कोटी १० लाख रुपये आहे.

तसेच आपल्या माहितीकरिता सांगू इच्छितो कि, हार्दिक पांड्याने परिधान केलेल्या बुटाची किंमत एक लाख रूपयापर्यंत असेल असा अंदाज काही वेबसाईटनं व्यक्त केला आहे. हार्दिकच्या पायात क्रिसचियन लुबाउटिनचे लु स्पाइक्स शूज असतात व हार्दिक याच कंपनीचे शूज घालतो.

ब्लॅक काफफिश लेदरच्या या बूटाची किंमत बाहेर देशात जवळपास ७० हजार रुपये इतकी आहे. भारतात हा बूट आयात केला जातो त्यामुळे त्याची किंमत वाढून जवळपास एक लाखापर्यंत असेल.

तसेच हार्दिकला हिरे फार आवडतात. विश्वचषक होण्यापूर्वी त्याने खास डायमंड बॅट आणि बॉल लॉकेट बनवले होते.

महत्वाची आणि सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे अशी कि, हार्दिक पांड्याकडे लँबोर्गिनी हुरकॅन हि गाडी आहे. या गाडीची भारतातील किंमत जवळपास ३.५८ कोटी रूपये इतकी आहे. माध्यमांच्या माहितीनुसार विराट आणि धोनीपेक्षाही महागडी गाडी हार्दिक पांड्याकडे आहे.

About admin

Check Also

मेरी पत्नी को खरीदें, पति ने फेसबुक पर किया पोस्ट, जानिए आगे क्या हुआ?

मेरी पत्नी को खरीदें, पति ने फेसबुक पर किया पोस्ट, जानिए आगे क्या हुआ?

दुनिया में कई अजीबो-गरीब लोग रहते हैं। कभी-कभी कुछ लोग ऐसी चीजे करते हैं जिसकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *