तुम्ही बऱ्याच लोकांचे पाय पाहिले असतील जर तुम्ही त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले असले तर काही लोकांच्या पायाचे बोट इतर बोटांपेक्षा मोठे असलेले तुम्हाला दिसून आले असेल. असे म्हंटले जाते कि, अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असेल तर ते लोक खूप भाग्यशाली असतात.
परंतु आम्ही याच्याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगणार आहोत ज्या क्वचितच लोकांना माहिती असतील. जर तुमच्याही पायाचे बोट मोठे आहे तर हि गोष्ट तुम्हाला जरूर जाणून घ्यायला हवी.
तुमच्या पायाचे बोट उलघडते अनेक रहस्ये ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असते ते दिसायला खूपच सुंदर असतात. अशामध्ये ते सावळे असो वा काळे असो पण त्यांचा चेहरा खूपच सुंदर असतो.
या कारणामुळे त्यांच्यामध्ये इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्याची क्षमता असते आणि लोकही त्यांच्याकडे इच्छा नसतानादेखील आकर्षिले जातात. खरे तर असे बरेच लोक तुम्ही पाहिले असतील जे दिसायला खूपच सुंदर असतात पण त्यांच्या चेहरा दिसायला खूपच कुरूप वाटतो.
जर एखाद्या महिलेच्या पायाच्या अंगठ्याजवळचे बोट मोठे असेल तर ती महिला आपल्या पतीवर खूप प्रेम करते परंतु कधीही ती आपल्या पतीसमोर ते प्रेम व्यक्त करू शकत नाही. म्हणजेच तिला आपले प्रेम व्यक्त करताना संकोच वाटतो. म्हणूनच आपल्या पतीवर खूप प्रेम करूनदेखील ती त्याच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करू शकत नाही.
खरे तर भारतीय मुलींच्या मनामध्ये लोकांकडून लाज आणि शरमेची प्रवृत्ती इतकी भरली जाते कि त्या कधीही आपले प्रेम व्यक्त करू शकत नाहीत कारण त्यांना असे वाटते कि जर आपण स्वतः आपल्या प्रेमाची कबुली दिली तर आपला पती आपल्याबद्दल काहीतरी चुकीचा विचार करेल. यामुळेच इच्छा असूनसुद्धा त्या उघडपणे आपले प्रेम व्यक्त करू शकत नाहीत.
ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याजवळचे बोट मोठे असते ते लोक खूप रागीट स्वभावाचे असतात परंतु त्यांचा हा राग फक्त बाहेरून असतो, खरे तर आतून ते खूप शांत आणि मृदू स्वभावाचे असतात. परंतु ते आपल्या आतल्या स्वभावाची जाणीव कोणालाही होऊ देत नाहीत.
यामुळे ते वरुन रागावतात. अशामध्ये त्यांना वाटत कि आपल्या आत लपलेल्या गुणांचा फायदा कोणीहि घेऊ नये. यासाठी आपल्या आतले गुण लपवण्यासाठी ते सारखे रागावत असतात.
ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याजवळचे बोट मोठे असते अश्या लोकांच्या आयुष्यामध्ये थोड्या समस्या असतात. पण काही काळानंतर हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी होतात. कारण सुरवातीला अशा लोकांच्या जीवनामध्ये समस्या उद्भवतात परंतु मेहनतीने ते आपल्या आयुष्यामध्ये सफलता मिळवतात. खरे तर प्रेत्येकाला बिना मेहनतीचे फळ मिळत नाही.
यासाठी आयुष्यामध्ये सफलता मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात कारण सफलता मिळवण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी रात्रंदिवस एक करावा लागतो.