मराठी मधील सर्वात लोकप्रिय मालिका होणार सुन मी या घरची या मालिकेने प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या मालिकेतील श्री आणि जान्हवी या जोड़ीला विशेष पसंती मिळत होती. याच मालिकेतून शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान घराघरात पोहचले. तेजश्रीचा काहीही हा श्री या डायलॉगने तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
शाळा आणि फुंत्रू या सिनेमांचा दिग्दर्शक सुजय डहाकेचा केसरी हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. मात्र हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक नवा वादही मराठी सिनेसृष्टीत सुरू झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या आधी दिलेल्या एका मुलाखातीत त्यानं सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही. असा प्रश्न केला होता. ज्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे.
केसरी चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके यांनं लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत मराठी मालिकांमध्ये सर्व ब्राह्मण मुलीच दिसतात इतर मराठी मुली का नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या वक्तव्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत सुजयचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. मी ब्राह्मण नाहीये तरी माझ्याकडे काम आहे. असं तेजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तेजश्री प्रधान हिनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं लिहिलं मी ब्राह्मण नाहीये बरं सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया काय. तेजश्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियवर खूप व्हायरल झाली आहे.
तेजश्री प्रधान व्यतिरिक्त अभिनेता शशांक केतकरनंही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. एक तरुण दिग्दर्शकानं असं काही बोलावं अशी अपेक्षा अजिबात नव्हती. त्यानं त्याच्या कामावर लक्ष द्यावं आणि त्यानं आतापर्यंत जसं चांगलं काम आमच्यासमोरं आणलं आहे तसं पुढेही यावं हीच त्याच्याकडून अपेक्षा आहे. पण अशाप्रकारे वक्तव्य करुन त्याला काय म्हणायचं आहे हे मला समजत नाही अशी प्रतिक्रिया शशांकनं दिली.
तेजश्रीचा साखरपुडा इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरे यांच्याशी ठरला होता. दरम्यान तेजश्री आणि शशांक यांचं प्रेमप्रकरण घरच्यांना समजल्यावर त्यांनी हा साखरपुडा मोडला आणि 8 फेब्रुवारी 2014 रोजी या दोघांनी लग्न देखील केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यांच्या नात्यात इतका दुरावा आला की ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते.
मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण शशांकने को-र्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. शशांकने या अर्जात असं लिहलं होतं तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते. वारंवार जुनियर आर्टिस्ट म्हणून हिणवून मा नसिक छ ळ करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचे त्याने सांगितलं असल्याचं बोललं जातं.
त्यांच्या घटस्फो टानंतर लवकरच ही मालिका संपवण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी शशांकने त्याची मैत्रिण प्रियांका हिच्यासोबत 2017 रोजी दुसरं लग्न केलं. तेजश्री अद्याप सिंगल आहे. मात्र आपल्या घटस्फो टाबद्दल या दोघांनी अद्याप उघड प्रतिक्रिया दिलेली नाही.
सध्या तेजश्री झी मराठीच्या अग्गबाई सासूबाई या मालिकेत काम करत आहे तर शशांक कलर्स मराठी वरील हे मन बावरे या मालिकेत दिसत आहे.