बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगन 50 वर्षांचा आहे. अजयची पत्नी काजोलने शाहरुख खानबरोबर बर्याच चित्रपटात काम केले आहे. पण शाहरुख खान आणि काजोल यांचे पती अजय यांच्यात एक गोड सं-बंध आहे. अजय 90 च्या दशकातील एक अभिनेता आहे ज्यांचा स्टारडम आजही कायम आहे. १९९१ मध्ये त्याने फूल और कांटे चित्रपटातून पदार्पण केले होते.
अजय देवगन 2 एप्रिल रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अजय देवगणची पत्नी काजोलने शाहरुख खानबरोबर बर्याच चित्रपटात काम केले आहे. पण शाहरुख खान आणि काजोल यांचे पती अजय यांच्यात एक गोड संबंध आहे.
अजय देवगणची पत्नी काजोलने शाहरुख खान सोबत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे करण-अर्जुन कुछ कुछ होता है अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. याखेरीज शाहरुख आणि काजोलसुद्धा खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत.
20 वर्षांपूर्वी जेव्हा कुछ कुछ होता है चित्रपटाचे शूटिंग चालू होते. त्यावेळी करण जोहरने एका पार्टीमध्ये शाहरुख खान आणि अजय देवगन यांच्याबद्दल काही प्रतिक्रिया दिल्या. यावर अजय खूप चिडला. त्यानंतर अजय चित्रपटाच्या सेटवर काजोलला भेटायला गेला त्यानंतर पहिल्याच दिवशी त्याला भेटू दिले नाही.
दुसर्या दिवशी जेव्हा तो पुन्हा काजोलला भेटायला आला तेव्हा गार्डने त्याला बाहेर रोखले आणि सांगितले की शाहरुखने कोणालाही आत येऊ दिले नाही. यानंतर अजय रागाने लाल झाला आणि सेटवर सगळ्यांसमोर शाहरुखला ढकलले आणि शाहरुखला शिवीगाळ करायला लागला. अजयचा राग पाहून शाहरुखने स्वत: ला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बंद केले.
दिलवाले चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान काजोलने याबद्दल सांगितले की अजय देवगन आणि शाहरुख खान मित्र नाहीत. आपण जर एखाद्याचे चांगले मित्र असाल तर याचा अर्थ असा नाही की आपला जोडीदार देखील त्याचा मित्र आहे. पण जर दोन लोक मित्र नसतील तर याचा अर्थ असा नाही की दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत.
90 च्या दशकात शाहरूख खान आणि काजोल या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. आजही तुमची आवडती बॉलिवूड जोडी कोण असे विचारल्यास अनेकांचे उत्तर काजोल-शाहरूख असेच येईल. 1993 साली बाजीगर या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर एकत्र झळकलेल्या या जोडीने यानंतर अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. यातल्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाने तर लोकप्रियतेचे अनेक विक्रम तोडलेत. करण अर्जुन कुछ कुछ होता है दिलवाले कभी खुशी कभी गम माई नेम इज खान अशा अनेक चित्रपटात काजोल व शाहरूखची केमिस्ट्री हटके ठरली.
रिल लाईफमध्ये इतक्या लोकप्रिय ठरलेल्या या जोडीला रिअल लाईफमध्ये एकत्र पाहण्याचा मोह कुणाला होणार नाही. याच मोहापोटी एका चाहत्याला एक वेगळा प्रश्न पडला. होय अजय देवगण भेटला नसता तर तू शाहरूखसोबत लग्न केलं असतंस असा प्रश्न या चाहत्याने काजोलला विचारला. खर तर या प्रश्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण काजोलने यावर अगदी तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे उत्तर दिले. पुरूषाने प्रपोज करायला नको का असे उत्तर तिने दिले.