‘लग्नानंतर करिअर खराब होतं.’ ही गोष्ट स्त्रियांनी बर्याच वेळा ऐकली असेल. या गोष्टीत बरेच सत्य देखील आहे. खासकरून जेव्हा आपल्याला लग्नानंतर कुटुंबाचा पाठिंबा नसतो. तीच गोष्ट बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनाही लागू झाली आहे. या अभिनेत्रींचे करियर आणि त्यांच्या लग्नाचा एकमेकांशी काही सं-बंध नाही, परंतु या अभिनेत्रींच्या कारकीर्दीवर त्याचा खोलवर परिणाम झाला आहे. चला याची काही उदाहरणे पाहूया.
माधुरी दीक्षित :- माधुरीचे प्रेम प्रकरण संजय दत्तबरोबर होते, पण संजय दत्तला बेकाय देशीरपणे ह त्यारे ठेवल्यामुळे तु-रुंगात जावे लागले. अशा परिस्थितीत माधुरीने अमेरिकेचे डॉक्टर श्रीराम नेनेशी अरेंज-मॅरेज लग्न केले. माधुरीचे लग्न झाले तेव्हा तिच फिल्मी करिअर खूप उंचावर होत.
दुसरीकडे, डॉ. नेने यांना माधुरीच्या स्टारडम आणि स्टार व्हॅल्यूबद्दल माहिती नव्हते. या लग्नामुळे माधुरी बॉलिवूडपासून दूर गेली. नंतर, बरीच विश्रांती घेतल्यानंतर माधुरीने चित्रपटात परतण्याचा प्रयत्न केला पण तिला काही खास यश आले नाही. त्यांनतर, ती डान्स रिऍलिटी शोचा न्या य करताना देखील दिसली आहे. सध्या माधुरी आपल्या दोन मुलांच्या संगोपनामध्ये व्यस्त आहे.
सोनाली बेंद्रे :- सोनालीचे बॉलिवूडमध्ये “मेजर साब” आणि “हम साथ साथ हैं” यासारखे हि ट चित्रपट दिले आहेत. जेव्हा तिने गोल्डी बहलशी लग्न केले तेव्हा ती तिच्या कारकीर्दीच्या पहिल्या नंबरच्या स्थानी होती.
मात्र लग्नाच्या बाबतीत तिला आपल्या फिल्मी करिअरशी तडजोड करावी लागली. त्यानंतर, इंडिया गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोमध्ये ती न्या याधीशही ठरली. काही महिन्यांपूर्वी तिला क र्क रो ग देखील झाला होता, उपचार घेतल्यानंतर ती अमेरिकेत परतली आहे.
ट्विंकल खन्ना :- जेव्हा ट्विंकलने बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असणाऱ्या अक्षय कुमारशी लग्न केले तेव्हा तिचे करियर खूप उंचावर होते.
पण, लग्नांनंतर लग्नाचा तिच्या कारकिर्दीवर परिणाम झाला आणि ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली. परंतु सध्या ती अभिनेत्री म्हणून सक्रिय नसलीतरी ती चित्रपट निर्माता म्हणून बर्यापैकी यशस्वी आहे. ट्विंकल देखील एक लेखक आहे आणि तिने आपले स्वतःचे पुस्तकहि लिहिले आहे.
काजोल :- १९९० च्या दशकात काजोल टॉप अभिनेत्री होती. मात्र, अजय देवगणशी लग्न केल्यानंतर तिची फिल्मी कारकीर्द बुडत गेली. नंतर काजोलने बर्याच वेळा बॉलीवूडमध्ये परतण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी अभिनेत्री होऊ शकली नाही. पण तिचा आताचा चित्रपट ‘तान्हाजी – द अनसंग व्हॅरियर’ मध्ये तिचा अभिनय दमदार आहे.
भाग्यश्री :- भाग्यश्रीचा बॉलिवूड डेब्यू ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र, या एका हि ट चित्रपटाच्या नंतरच तिने वयाच्या १९ व्या वर्षी हिमालय दासानीशी लग्न केले. लग्नांनंतर भाग्यश्रीच्या सासरच्यांनी तिला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली नाही आणि तिचे करियर संपले.
ऐश्वर्या राय :- मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळवलेल्या ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केले तेव्हा ती कारकीर्दीच्या शिखरावर होती. तिचा ‘धूम 2’ चित्रपट लग्नाआधी आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. लग्नानंतर ऐश्वर्याने बॉलीवूड मध्ये परतण्याचा प्रयत्न केला पण तिला काही खास यश आले नाही.