आपणा सर्व साऊथचा सुपरस्टार नागार्जुनला ओळखतच असाल, त्याचे पूर्ण नाव अक्किनेनी नागार्जुन असे आहे नागार्जुन एक भारतीय चित्रपट अभिनेता आणि निर्माता देखील आहे, त्याचा जन्म २ ऑगस्ट १९५९ रोजी मद्रास येथे झाला होता.
नागार्जुन दक्षीनचा स्वतः एक ब्रँड आहे. आणि त्याला कोट्यावधी लोकांनी पसंत केले आहे, त्याचे चाहतेही जगात बरेच आहेत, रजनीकांत सारखे संपूर्ण भारतात नागार्जुनचे चाहते त्याचे चित्रपट पाहण्यासाठी काहीही करण्यास इच्छुक आहेत.
नागार्जुनने बर्याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. “शिवा” आणि “विकी दादा” बाकीच्या चित्रपटांपैकी मुख्य या दोन चित्रपटांनी खूप खळबळ उडवली होती. साऊथचा नागार्जुन हेच नाव प्रत्येकाच्या जिभेवर होते आणि या दोन प्रभावी चित्रपटांमुळे ते अजून प्रसिद्ध झाले. .
नागार्जुनचा मुलगा अक्किनेनी नागा चैतन्य देखील एक अभिनेता आहे चैतन्य वडिलांप्रमाणेच देखणा आणि हुशार आहे आणि त्याची पत्नी देखील खूप धाडसी आणि सुंदर आहे.चैतन्यच्या पत्नीचे नाव समंथा रुथ प्रभु आहे जी जी एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे समंथा रुथ प्रभू विषयी माहिती देणार आहोत, जी अत्यंत सुंदर आणि बोल्ड दिसत आहेत.
समंथा रूथ प्रभु हि तेलुगु आणि तमिळ चित्रपटांची अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहेत. समंथाचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी चेन्नई येथे झाला. समंथा रुथ प्रभूने आपले शिक्षण होली एंजेलस एंग्लो इंडियन उच्च माध्यमिक विद्यालय चेन्नईमधून पूर्ण केले. त्यानंतर, समंथा रूथ प्रभूने स्टेला मेरीस कॉलेज चेन्नई येथून वाणिज्य शाखेत पदवी घेतली, ती त्या काळातील कॉलेजमधील सर्वात हुशार मुलींपैकी एक होती.
तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात तेलुगू चित्रपट “ये माया चेसवा” ने केली होती, त्यानंतर तिने बर्याच चित्रपटांमध्ये काम केले. संमथा रुथ प्रभूला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री दक्षिण फेअर फिल्मफेअर अवॉर्ड-साऊथ पुरस्कार दिला होता.
समंथा प्रभुने तेलुगु चित्रपटसृष्टीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्री फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारी समंथा रूथ प्रभु दुसरी अभिनेत्री ठरली आहेत.
समंथाच्या वडिलांचे नाव जोसेफ प्रभु आणि तिच्या आईचे नाव निनेत्ते आहे तिला एक भाऊ आहे ज्याचे नाव जोनाथन प्रभू आहे, समंथाने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्याशी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी लग्न केले, आणि ते त्यांचे विवाहित जीवनातं पूर्णपणे आनंदी आहेत.
समंथा ही एक अभिनेत्री तसेच अनेक ब्रॅण्ड्स आणि उत्पादनांसाठी प्रमुख सेलिब्रिटी एंडोर्सर आहे ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती जीतकी सोशल मीडियावर सक्रिय दिसते , तितकेच तिचे चाहतेही सक्रिय दिसतात , आणि तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात आणि लाईक देखील करतात