आत्ता जाऊन माहिती झालं कि का इंडस्ट्री सोडून गायब झाला होता अभिनेता चंद्रचूड़,मुंबई सोडूनही जावे लागले होते त्यांना ...

आत्ता जाऊन माहिती झालं कि का इंडस्ट्री सोडून गायब झाला होता अभिनेता चंद्रचूड़,मुंबई सोडूनही जावे लागले होते त्यांना …

‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता चंद्रचूड लोकांना फारच आठवत असेल. कदाचित नवीन पिढी चंद्रचूडला  ‘चप्पा चप्पा’ गाण्याच्या  नावावरून ओळखत असेल.

त्यांच्या ‘माचीस’ चित्रपटाचे ‘चप्पा-चप्पा चरखा चले’ हे गाणे आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोक ऐकत आहे. पण प्रश्न असा आहे की चंद्रचूड कुठे गायब होते? किंवा  चंद्रचूडसुद्धा इंडस्ट्रीमध्ये चालू असलेल्या नेपोटिज्म बळी ठरले होते?

चंद्रचूड हे संगीत शिक्षक होते  :-  चंद्रचूड हे देहरादून येथे असलेल्या दून स्कूलमध्ये संगीत शिक्षक होते. पण त्यांना लहानपणापासूनच अभिनेता होण्याची आवड होती. शेवटी चंद्रचूडने काही लोकांच्या ओळखीने मुंबई गाठली.

९० च्या दशकात अमिताभ बच्चन यांचे प्रॉडक्शन हाऊस एक नवीन चित्रपट बनवणार होते  ज्यासाठी नव्या अभिनेत्याची गरज होती. या दरम्यान, चंद्रचूड यांनी चांगल्या व्यक्तिमत्त्वाने ऑडिशन दिले आणि निवड होईल का नाही याची काळजी न करता ते घरी परतले.

अशातच चंद्रचूडला त्याचा पहिला चित्रपट मिळाला :- पण जेव्हा ते घरी आले तेव्हा जया बच्चन यांचा फोन आला आणि चंद्रचूड यांना ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटासाठी निवडले गेले असल्याचे सांगण्यात आले हे ऐकून त्यांच्या आनंदला सीमाच उरली नव्हती.

यावेळी, चंद्रचूडच नव्हे तर आणखी एका नव्या अभिनेत्याने त्यांच्याबरोबर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. होय, आम्ही बोलत आहोत अरशद वारसी, ज्याचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. चंद्रचूडने त्यांच्या पुढच्या ‘माचिस’ चित्रपटात अभिनय केला. हा चित्रपट गुलजार यांनी बनवला होता. 90 च्या दशकात माचीस या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

‘माचिस’ चित्रपटाच्या नंतर चंद्रचूडने इतर बर्‍याच चित्रपटांमध्येही काम केले, परंतु त्यांचा जोश हा चित्रपट चंद्रचूडचा स्मरणीय चित्रपट मानला जातो. मन्सूर खान निर्मित जोश या चित्रपटामध्ये चंद्रचूडसह माजी विश्व सौंदर्य विजेत्या ऐश्वर्या राय आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहरुखने ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारली होती.

चंद्रचूड कुठे गायब होता? :- हिंदी सिनेमात, आमदनी अठन्नी खर्चा रुपया, दाग, सिलसिला है प्यार का, आणि बेताबी सारख्या चित्रपटात काम करणारे चंद्रचूड अचानक गायब झाले. पण त्या काळात नेपोटिज्मचा कोणताही उल्लेख नव्हता किंवा अभिनेता हरवल्याबद्दल कोणतीही बातमी घेण्यात आली नव्हती. पण आता चंद्रचूड गायब होण्याचे खरे कारण कळले आहे की अचानक चित्रपटश्रुष्टि सोडून ते कुठे गायब झाले आणि का?

चंद्रचूड हे संगीत शिक्षक आहेत :- चंद्रचूड, जे संगीत शिक्षक होते, इंट्रोवर्ट आहेत. पण अभिनेता गायब होणे ही वेगळीच गोष्ट होती. खरं तर, चंद्रचूड यांचे चित्रपटश्रुष्टितुन गायब होण्याचे दोन कारण होते, पहिले म्हणजे, गोव्यात त्यांचा एक वाईट अपघात झाला होता, ज्यामुळे त्यांच्या खांद्यांचे नुकसान झाले होते, तर दुसरे कारण म्हणजे घटस्फो ट आणि मुलगा एकट्याने वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. म्हणून ते चित्रपटश्रुष्टि पासून गायब होते.

पण आता सर्व काही ठीक झाल्यावर दिग्दर्शक राम माधवांनी चंद्रचूडला आपल्या ‘आर्य’ या वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर दिली, तेव्हा चंद्रचूड नाकारू शकले नाही. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेनने चंद्रचूडबरोबरही पुनरागमन केले आहे. चंद्रचूड यांनी सांगितले की बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनबरोबर एक चित्रपट साइन केला होता, परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट बनला नाही.

About admin

Check Also

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

52 साल की उम्र में तब्बू ने शर्ट के बटन खुले रख माहौल किया गर्म, देखें नींद लाने वाली तस्वीरें

दोस्तों बॉलीवुड जगत की एक ऐसी अभिनेत्री जिसने अपने हर किरदार से लोगों का दिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *