मित्रांनो, तुम्हाला आठवेल की “हम साथ साथ है” याचित्रपटामध्ये एक गोंडस मुलीने अभिनय केला होता, त्यावेळी तिच्या अभिनयाने सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला होता. आज ती खूप मोठी झाली आहे, आणि सौंदर्यात ती अप्सरापेक्षा कमी नाही,
ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे आणि तिचे सुंदर फोटो अपलोड करत राहते. आता झोया अफरोज अवघ्या 26 वर्षांची आहे, तिने बाल कलाकार म्हणून बर्याच चित्रपट, मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिने 2013 मध्ये मिस इंडिया इंदौर ताज जिंकला होता.
झोया अफरोजचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये झाला आणि तिथेच लहानाची मोठी झाली. तिने आर.एन. शाह हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आणि मुंबईतील विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.जोया अफरोज केवळ 3 वर्षांची असताना तिने तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.
जोयाला रासनाद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेतून मोठा ब्रेक मिळाला.जोयाने अनेक मोठ्या अभिनेत्री, अभिनेत्यांबरोबर काम केलेले आहे. जोयाने सलमान खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे यांच्याबरोबर काम केलेले आहे.
झोया लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, एका मुलाखतीत झोयाने सांगितले की, अभिनय हे तिचे आयुष्य आहे, जेव्हा झोया लहानपणी काचे समोर अभिराहून अभिनय करायची तेव्हा तिला तिच्या वडिलांनी एक नौटंकी म्हटले पण तिला काहीहि चुकीचे वाटले नाही आणि सतत अभिनय करत रहायची.
तिची अभिनय प्रतिभा पाहून तिच्या आई-वडिलांनीही तिला पाठिंबा दर्शविला आणि आज तिला लोक तिच्या नावाने ओळखतात.
झोया, प्रियंकाला आणि दीपिकाला तिचे रोल मॉडेल्स मानते, पुढे झोया अशी म्हणाली की ती कलाकारांच्या आधारे चित्रपट निवडते. झोयाच्या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि स्टारकास्ट चांगली आहे, त्यामुळे तिचा चित्रपट नक्कीच चांगला चालतो. इंडस्ट्रीतील लोकांनी तिला जन्मजात अभिनेत्री म्हटले आणि हे बर्याच अंशी खरे आहे.
जोया सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये सक्षम आहे आणि तिने ‘द एक्सपोज’ या चित्रपटाच्या भूमिकेतुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली.
या चित्रपटाच्या प्रवासात झोया तिच्या कुटुंबाची भूमिका आणि पाठबळ आणि योगदान आहे. जोया शॉप्पेर्स स्टॉप, व्हर्लपूल, pspo, न्यूयॉर्क लाइफ इन्शुरन्स, जेट एअरवेज यासारख्या टीव्ही जाहिरातींचा भाग बनली आहे.