बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान बर्याचदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव असते. तीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिची प्रत्येक गोष्ट वेगाने लोकप्रिय होत आहे. साराचे सैफची दुसरी पत्नी करीनाशीही खूप चांगले सं-बंध आहेत.
सारा काही दिवसांपूर्वी करीना कपूरच्या शोमध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमामध्ये साराने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीही अनेक गोष्टींचा खुलासा केला. सारा आणि करीना या दोघींची चांगली मैत्री असून त्यांच्यातलं बॉण्डींग अनेक वेळा पाहायला मिळतं.
अलिकडेच एका कार्यक्रमामध्ये करीनाने साराला वन नाईट स्टॅण्डबाबत प्रश्न विचारला. यादरम्यान करीनाने साराला अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले ज्यांचे उत्तर तिने एकदम बिनधास्तपणे दिले. तसंच प्रियकराला खट्ट्याळ विनोद पाठवतेस का असाही प्रश्न करीनाने विचारला
या प्रश्नाचे उत्तर देताना सारा थोडी लाजली. करीनाने साराला आणखी एक वैयक्तिक प्रश्न विचारला होता. करीना साराला म्हणाली- मला हा प्रश्न विचारू वाटत नाहीये पण आम्ही आधुनिक माणसे आहोत. म्हणूनच विचारते तू कधी वन नाईट स्टँड केले आहे का नाही हे मला जाणून घ्यायचे आहे.
वन नाईट स्टँड करणे म्हणजे एखाद्याबरोबर एक रात्र घालवण्यासारखे आहे. साराने करिनाच्या या प्रश्नाला उत्तर दिले आणि म्हणाली- नाही मी असे कधी केले नाही. यानंतर करिनाने सुटकेचा श्वास घेतला.
सोशल मीडियावरही तिची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत आहे. साराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. त्यातही तिचं आणि करीना कपूरचं नातं कसं आहे हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. साराने नुकतंच एका प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशू ट केलं. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत करीनाविषयीच्या नात्यावर सारा व्यक्त झाली.
फेमिना या मासिकाच्या कव्हर पेजवर येण्याची संधी साराला मिळाली. मुलाखतीत करीनाविषयी सारा म्हणाली करीना माझी मैत्रीण आहे पण त्याहीपेक्षा अधिक ती माझ्या वडिलांची पत्नी आहे. मी तिचा आदर करते आणि मुख्य म्हणजे ती माझ्या वडिलांना खूश ठेवते. आम्ही दोघंही एकाच इंडस्ट्रीत असल्याने अनेकदा गप्पांमध्ये अभिनय चित्रपट या विषयावर बोलत असतो.
करीना माझी सावत्र आई आहे हे मला वडिलांनीच सांगितलं होतं. पण करीनाला माझी चांगली मैत्रीण व्हायचं आहे तिनं हे फार पूर्वीच मला सांगितलं होतं. ती सावत्र आई असली तरी मी तिला छोटी माँ म्हणून कधीही हाक मारणार नाही तिला ते अजिबातच आवडणार नाही असंही सारा गंमतीनं म्हणाली होती.करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. सारासोबत चांगली मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करीनाने नेहमीच केला आहे. त्यामुळे सारासुद्धा करीना आणि तैमुरसोबत आनंदाने वावरताना दिसते.
दरम्यान खरंतर करीना साराची दुसरी आई आहे. परंतु या दोघींमध्ये आई-मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नात अधिक आहे. सैफने २०१२ मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं. त्यांना तैमुर नावाचा एक मुलगादेखील आहे. तर सारा सैफच्या पहिल्या पत्नीची मुलगी असून तिने २०१८ साली ‘केदारनाथ’ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. काही महिन्यामागे तिचा लव आजकल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.