मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल कि बॉलिवूड चित्रपटसृष्टी मध्ये नेहमी नवनवीन गोष्टी घडत असतात तसेच मराठी चितपट असृष्टीमध्येही अश्या अनेक घडामोडी होत असतात त्यांच्याबद्दल तुमच्यापर्यंत लवकर माहिती पोहचत नाही किंवा मराठी कलाकारांच्या अनेक बातम्या तुमच्यापर्यंत पोहचत नाही .
तुम्हाला सैराट चित्रपटामधील रिंकू माहीतच असेल तिने सैराट चित्रपटामध्ये कमालीची आपली भूमिका साकार केली आहे ,तिच्या अभिनयाचे लाखो चाहते झाले आणि प्रेक्षकांनी तिला अनेक दिवस आपल्या डोक्यावर उचलून धरले .आणि सैराट चित्रपट इतका लोकप्रिय झाला कि मराठी चित्रपटाने प्रथमच १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केलेला पहिला चित्रपटही तो ठरला .
आपण सर्वांनी सैराट बघितला तसेच त्यातील आरची आणि परश्याची जी भूमिका होती तिने अक्षरशः सर्वांना वेड केलं. परंतु पूर्ण फिल्म मध्ये आरची आणि परशा यांची तुलना करायची म्हंटली तर प्रेक्षकांनी आर्चीच्या अभिनयाला ला भरभरून प्रेम दिल.
सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू हिने प्रेक्षकांची मन अशा प्रकारे जिंकली आहे कि ती रातोरात सुपरस्टार झाली. तसेच रिंकू कागर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटात सुद्धा तिच्या अभिनयाचं पोटभरून कौतुक झालं.
रिंकू राजगुरू कलर्स मराठी वरील एका कार्यक्रमात उपस्तित झाली होती. ‘एकदम कडक’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. तर या कार्यक्रम दरम्यान तिला एक प्रश्न विचारला गेला होता कि, तुला बॉलिवूड च्या कोणत्याही सुपरस्टार बरोबर दे ट वर जाण्याची संधी मिळाली तर तू कुणासोबत जाण पसंत करशील.
या प्रश्नानंतर रिंकूने क्षणाचाही विलंब न लावता विकी कौशल या कलाकाराचे नाव घेतले. आणि यावरून असं समजत कि रिंकू विकी ची एक मोठी चाहती आहे. विकी कौशल ला तर आपण ओळखतच असाल, विकीने नेटफ्लिक्स वर ‘ल स्ट स्टोरीज’ चा सिरीज मध्ये काम केलेलं आहे तसेच , ‘उरी-द स र्जि-कल स्ट्रा-ईक’ या चित्रपटामुळे विकीला एक मोठा स्टारडम मिळाला आहे.