सात समुद्र पार करून रूस वरून छठ करण्यासाठी पोहचली विदेशी सून , आणि मग ...

सात समुद्र पार करून रूस वरून छठ करण्यासाठी पोहचली विदेशी सून , आणि मग …

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथं अनेक जा ती-ध र्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक सण मिळून मिसळून साजरा करतात. असं आपण लहानापासून ऐकत आलोय.

आणि हे सगळं अगदी खरं असल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहिलेत. इथल्या संस्कृती परंपरेचा गर्व इथल्या लोकांना तर आहेच, शिवाय विदेशी लोकं देखील ती अभिमानाने मिरवत असतात. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातील पाटण्यात घडली आहे.

सध्या देशात छठ पूजन साजरे केले जाते आहे. अशातच एक जोडपे छठ पूजन करण्यासाठी थेट रशियावरून भारतात आले आहे. ही गोष्ट आहे अनिल आणि एलिनाची. रशियाच्या एलिनाला ना हिंदी कळते ना इंग्रजी.

पण संस्कृती आणि परंपरा याची तिला पुरेपूर माहिती आहे. तिला छठ महापर्वाचे महत्त्व देखील माहित आहे, म्हणूनच सात समुद्र ओलांडून एलिना आपल्या पतीसह सासरी पाटण्यातील कांकरबाग येथे आली. ती दुसर्यांदा ३६ तास उपवास ठेवून महापर्व छठ पूजा करणार आहे. ती म्हणते की, तिला परंपरा जोपासण्याचा खूप आनंद आहे.

एलिना म्हणाली, छठ उत्सवात आधी सासू मदत करायच्या. पण गेल्या वर्षी सासू आजारी पडली तेव्हा तिने स्वतः ही परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेतला. यावर्षीसुद्धा ती छठ पूजन करण्यासाठी सासरी आली आहे.

घरातील सर्व सदस्यांसह साफसफाईचे काम पूर्ण झाले आहे. गहू धुवून वाळवण्यासोबतच गूळ आणि तांदूळ देखील स्वच्छ केले आहेत. बुधवारी नाहि-खोय आणि दुसर्‍या दिवशी खरना करणार आहे. ती म्हणते, जन्मापासून तिने कधी उपवास केलेले नाही. असे असूनही, दोन दिवस बिना पाण्याचा उपवास करण्यात कोणतीही अडचण येत नाही. याउलट उपवासानंतर तिला तंदरुस्ती येते.

एलिना सांगते, तिचे आई वडील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना या उत्सवाबद्दल काहीही माहिती नाही. यानंतरही आपल्या घरची परंपरा सुटू न देण्याचा तिला खूप आनंद झाला आहे.

सहा वर्षांपूर्वी लग्न झाले :- cएलिनाचा पती अनिल यांचे म्हणणे आहे की तो फिनलँडच्या सीमेवरील फोडोपोका शहरात रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. तिथेच तो एलिनाला भेटला. सहा वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केले. त्यानंतर एलिना छठ उत्सवात दरवर्षी पाटण्यात येते.

फक्त रशियन समजतात :-  अनिल सांगतो की, एनिलाला हिंदी किंवा इंग्रजी भाषा समजत नाही. ती फक्त रशियन बोलते. सासूला विधी पूजा करताना बघूनच ती हे सगळं शिकली आहे. जर माझी आई काही बोलली, तर मी ते रशियनमध्ये अनुवादित करुन तिला सांगतो. ती घराची परंपरा खूप चांगल्या प्रकारे पाळते आहे.

About admin

Check Also

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

बॉलीवुड एक्ट्रेस आलिया इन दिनों अपनी आने वाली फिल्म डार्लिंग्स के प्रमोशन पर जोरों से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *