आरोग्यासाठी योग्य ते खाणे खूप महत्वाचे आहे. कधी खायचे? किती खायचे? आणि कोणत्या वेळी खायची? जर या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या तर आपली दिनचर्या ठीक होईलच तसेच आपले आरोग्यही एकदम टकाटक राहील. असे आढळले आहे की काहीजण लवकर जेवून घेतात आणि काही रात्री उशिरा ते खातात.
जेवणाचा वेळ आणि प्रमाण याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. रात्री खाल्लेल्या अन्नाचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. जर रात्रीचे जेवण चांगले नसेल तर त्याचा परिणाम आपल्या झोपेवर नक्कीच होईल.
आयुर्वेदनुसार झोपण्याच्या दोन तास आधी जेवण करायला हवं. जर जेवल्यानंतर लगेच झोपी गेलाट तर त्याने लठ्ठपणा वाढवतो आणि पचनसंस्था बिघडते. झोपेच्या आधी खाऊ नयेत अशा बर्याच गोष्टी आहेत कारण त्याचा नकारात्मक परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगू जे झोपण्यापूर्वी खाणे टाळली पाहिजे.
1- पास्ता : पास्ता खूप लवकर तयार होतो. दिवसभर थकून आलेले लोक झोपेच्या आधी लवकर बनवून खाऊन घेतात. त्यात कार्बोहायड्रेट्स आणि इतर बरेच पदार्थ असतात जे शरीर लवकर पचवू शकत नाहीत. रात्री उशिरा कोणी पास्ता खाल्ल्यास, त्यांना बद्धकोष्ठता आणि हायपर ऍसिडिटी सारखी समस्या उद्भवू शकते.
2 – मसालेदार पदार्थ : जास्त मसालेदार अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते. रात्री झोपेच्या आधी मसालेदार अन्न खाल्ल्यास शरीरात पित्त वाढते. जे शरीरासाठी हानिकारक असतं. म्हणून, रात्री मसालेदार अन्न खाणे टाळले पाहिजे.
3- मिठाई : रात्री उशिरा मिठाई खाणे देखील आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होते. झोपायच्या आधी कधीही मिठाई खाऊ नका, यामुळे दात खराब होतात. तसेच लठ्ठपणा देखील वाढतो ज्याचा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून, असे म्हणतात की रात्री चॉकलेट खाऊ नये.
4- नूडल्स : नूडल्समध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. म्हणून झोपेच्या आधी नूडल्स खाल्ल्या नाही पाहिजे. तथापि, नूडल्स फार लवकर तयार होतात, म्हणून लोक ते अधिक प्रमाणात खातात. आपल्या माहितीसाठी नूडल्समध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात. जे चरबीमध्ये बदलते. झोपेच्या आधी नूडल्स कधीही खाऊ नयेत, नाही तर यामुळे पोटाशी संबंधित बर्याच समस्या उद्भवतात.
5- जास्त फायबर असलेल्या भाज्या : फायबर असलेल्या भाज्या खाल्ल्याने पोट बर्याच वेळ भरलेलं राहतं. अशा भाज्या आहेत – ब्रोकोली, कांदा, कोबी इ. ते झोपेच्या आधी खाऊ नयेत कारण फायबर पचनशक्तीची गती कमी करते. ज्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते.