केळी हे एक असे फळ आहे जे सर्वांनाच आवडते. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक हंगामात बाजारात उपलब्ध असते. आरोग्यकारक असण्यासोबतच केळी खाण्यात चवदार असते. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की केळी अनेक प्रकारे खाण्यात वापरली जाऊ शकते. हे फळ कोशिंबीरीपासून भाज्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. पण सामान्य घरात लोक हे फक्त फळ म्हणूनच खातात. बाजारात केळी डझन या हिशोबाने विकत मिळते.
अशा परिस्थितीत केळी विकत घेताना काही गोष्टींची काळजी घेतली तर बाजारातून तुम्ही चांगली केळी घरी आणू शकता. जर तुम्ही चांगली केळी निवडली तर ती लवकर खराब होणार नाही आणि त्याची चवही बरेच दिवस चांगली राहील. तर मग आज आपण बाजारात केळी निवडताना काय लक्षात घ्यायला हवे ते बघूया.
रंगाकडे लक्ष द्या : केळीचा रंग जितका पिवळा धमक असेल तितके ते चांगले आणि स्वादिष्ट असतील. जेव्हा आपण बाजारात केळी खरेदी कराल तेव्हा त्याच।ठिकाणावरून केळी खरेदी करा ज्याठिकाणी पिवळ्या रंगाच्या दिसत आहेत. हे देखील लक्षात असू द्या की केळी जी पिवळसर आणि हिरवी दोन्ही रंगाची आहे ती विकत घेऊ नये .
कारण ती आतून अर्धीच पिकलेली असते आणि तिची चवही चांगली नसते. केळी पूर्णपणे हिरवी असेल ती कच्ची असते आणि ती भाजी बनण्यासाठी वापरली जाते. हे देखील लक्षात घ्यावे की केळीमध्ये कमीतकमी काळे ठिपके असावेत. जर जास्त केळी जास्त काळे ठिपके असलेली असेल तर ती लवकर गळून पडते किंवा खराब होते.
आवश्यकतेनुसार घ्या : केळी सर्वात स्वस्त फळ आहे. हे पौष्टिक देखील आहे म्हणून सहसा लोक डझनभर केळी खरेदी करतात. परंतु २ ते ३ दिवसात संपतील शक्य तितकिच केळी खरेदी करा. खरं तर, बरेच दिवस ठेवल्याने केळी लवकर गळून पडतात. म्हणून आवश्यकतेनुसार केळी खरेदी करा आणि ती संपल्यावर पुन्हा खरेदी करा.
आकार बघून घ्या : बाजारात तुम्हाला अनेक प्रकारात केळी सापडतील. ते चव आणि आकार दोन्हीमध्ये भिन्न असतात. मोठ्या आकाराचे केळी खरेदी करण्याचा प्रयत्न करा कारण काळी ठिपके लहान आकाराच्या केळीमध्ये जास्त असतात आणि यामुळे त्या लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते.