घरात कुठं गोड पदार्थाचा तुकडा पडल्यावर लगेच मुंग्या घरात येतात, पण कधी कधी अनेक वेळा मुंग्या विनाकारण घरात जमतात. शास्त्रानुसार घरात मुंग्यांचे येणे हे शुभ आणि अशुभ क्षणाचे संकेत असते. इतकेच नाही तर मुंग्या भविष्यात होणाऱ्या नुकसानीबद्दलही सांगतात. चला तर आपणाला सांगतो की, घरात मुंग्या येणे काय संकेत देतात.
काळ्या मुंग्यांचे येणे : घरी काळी मुंग्या येणे आपल्या आयुष्यातील मोठ्या बदलांचे लक्षण आहे. अशात मुंग्यांना पीठ किंवा साखर खाणे आपल्यासाठी अनुकूल असेल.
घरात आनंद आणि समृद्धीचे चिन्ह : जर तुम्हाला अचानक मुंग्या एखाद्या गटात फिरताना दिसल्या तर समजून घ्या की आपल्या घरात आनंद आणि समृद्धी असेल. तसेच समाजात तुमचा आदर आणि मान-सन्मान वाढेल.
तांदळाच्या भांड्यात मुंग्या दिसल्या तर : जर आपल्याला तांदळाच्या भांड्यात काळ्या मुंग्या दिसल्या तर आपल्याला पैसे किंवा नोकरीत प्रमोशन मिळणार असल्याचे समजून घ्या. याशिवाय मुंग्या सोन्याच्या वस्तू किंवा खोलीच्या छतावरुन बाहेर पडणे देखील घरात पैसा येणार असल्याचे शुभ संकेत असते.
अशुभ चिन्ह म्हणजे लाल मुंग्यांचे येणे : शास्त्रानुसार घरी लाल मुंग्यांचे येणे चांगले लक्षण ठरणार नाही. लाल मुंग्या ही भविष्यातील आर्थिक संकटे किंवा इतर कोणत्याही तोट्याचे चिन्ह आहेत. अशा वेळी आपण त्यांना लगेचच घराबाहेर काढले पाहिजे.
लाल मुंग्या घर बनवत असतील तर : घरात लाल मुंग्या गोळा होणे हे मोठ्या संकटाचे किंवा आजाराचे लक्षण आहे. अशा स्थितीत मुंग्यांना साखर घातल्याने घराचा त्रास टळेल.
जर या दिशेने मुंग्या येत असतील तर : जर काळ्या मुंग्या उत्तर किंवा दक्षिण दिशेने बाहेर येत असतील तर समजून जा की, आपल्या कुटुंबात सुख समृद्धी वाढणार असून आपल्याला एक चांगली बातमी मिळणार आहे. पूर्वेकडून काळ्या मुंग्या बाहेर येत असल्यास ते नकारात्मक सूचना मिळण्याची चिन्हे असू शकतात.
जर काळ्या मुंग्या घराच्या पश्चिम दिशेने निघून येत असतील तर समजून घ्या की तुम्हाला अनपेक्षित प्रवास करावा लागनार आहे.
आपण नवीन घर विकत घेत असल्यास, हे लक्षात ठेवा : नवीन घर विकत घेण्यापूर्वी तेथे मुंग्यांचा वारूळ नाही हे काळजीपूर्वक तपासा. असल्यास, प्रथम त्यांना पीठ, साखर किंवा साखर घाला. त्यानंतर आपले काम सुरू करा.
स्वप्नांमध्ये मुंग्या दिसणे : स्वप्नात कमी मुंग्या दिसणे चांगले आणि अधिक मुंग्या दिसणे हे अडचणीचे लक्षण आहेत. अशा वेळी त्यांना गुळ किंवा साखर दिल्यास घरात गुडलक येईल.
मुंग्याना मारणे चुकीचे : मुंग्यांना घराबाहेर काढण्यासाठी त्यांना मारू नका तर लिंबू, तमालपत्र, काळी मिरी इत्यादी ठेवा. यामुळे त्या स्वतःहून निघून जातील.