काळानुसार नात्यात काही बदल होतात. परंतु आपल्याला असे संकेत मिळायला लागले तर समजून घ्या की आता आपल्या जोडीदाराचा या नातेसं बंधात आणि तुमच्यात काहीही इंटरेस्ट राहिलेला नाही.
असे म्हणतात की वेळ एकसारखी कधीच नसते. काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते, मग ते आपले नातेसं-बंध का असेनात. परंतु प्रत्येक वेळी नात्यात सकारात्मकच बदल होईल असे नाही. कधीकधी व्यक्तीची आवड देखील वेळानुसार बदलत जाते. कदाचित ती आपल्याशी संबंधात असेल आणि काही काळानंतर तिला वाटायला लागते की आपण तिच्यासाठी योग्य जोडीदार नाही.
किंवा असेही असू शकते की तिच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली असावी जिला ती तुमच्यापेक्षा जास्त पसंद करते आणि आपल्यातील त्यांची आवड संपली असेल. जरी बरेचसे पुरुष अशा परिस्थितीत स्वत:हुन काहीच बोलत असले, तरीही त्यांचे बदलले वागणे बोलणे बरेच काही सांगते. अशात आपण ते संकेत समजून घेतले पाहिजे आणि स्वत:ला पुढे जाण्याची संधी देणे महत्वाचे आहे. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबद्दल सांगत आहोत, ज्यातून असे सूचित होते की आपल्या जोडीदारास यापुढे आपण नकोसे आहात.
आतल्या आत जाणीव होणे : ही एक अशी गोष्ट आहे जी सांगता येत नाही, परंतु आपण ती जाणवू शकता. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तेव्हा आपल्याला कुठेतरी त्याची जाणीव होते. त्याचप्रमाणे, जर आपण आता आपल्या जोडीदाराच्या हृदयात नसाल तर आपल्याला नक्कीच ते कोठेतरी जाणवेल. अशा परिस्थितीत आपल्यात अशी काही भावना असल्यास नक्कीच त्याच्या शोध घ्या. कधी कधी हे फक्त आपले अति विचार करणे देखील असू शकते. परंतु जे काही असेल, त्याबद्दल आपल्या जोडीदारासोबत त्याबद्दल उघडपणे बोलले पाहिजे.
संभाषणात रस नाही : जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाला आवडत असेल किंवा तो तिच्यावर प्रेम करत असेल तेव्हा त्याला तिचे म्हणणे ऐकावेसे वाटते. जेव्हा आपण बोलाल तेव्हा त्याचे संपूर्ण लक्ष आपल्यावर असेल. पण जर त्याला आता तुम्ही आवडत नसाल तर तो तुमच्याशी बोलण्यात काहीच रस घेणार नाही. हे असेही असू शकते की जेव्हा आपण त्याच्याशी बोलायला जाणार तेव्हा तो व्यस्त असल्याचे ढोंग करेल किंवा आपण त्याच्याशी बोलत असताना तो फोनमध्ये डोकं घालून बसेल किंवा इतर कुठं लक्ष देईल.
पुढाकार न घेणे : नात्यात दोन लोक असतात आणि म्हणूनच दोघे जोडीदार त्यांचे नाते सुधारण्याचा मिळून प्रयत्न करतात. पण आता जर तुमचा जोडीदार या नात्यात आनंदी नसेल किंवा त्यातून बाहेर पडायचे असेल तर तो स्वत:हून पुढाकार घेणार नाही. ना तो आपलं नात सुधारण्याचा प्रयत्न करणार नाही आपल्याला भेटून आपल्यासोबत वेळ घालविण्याची त्याची इच्छा असणार.
खोटे बोलणे किंवा गोष्टी लपवणे : जेव्हा एखाद्या व्यक्तीची आपल्या जोडीदाराबद्दल आवड कमी झाली असेल तर याचा अर्थ असा की आता त्याला दुसरी कुठली व्यक्ती आवडायला लागली असू शकते. अशा परिस्थितीत, जर तो सरळ आपल्या मनातील गोष्ट सांगू शकत नसेल तर नक्कीच आपल्याला त्याच्या वागण्यावरून हे कळेल.
कदाचित त्याचा फोन नेहमी व्यस्त येत असेल किंवा तो आपल्याशी खोटे बोलून इतरत्र फिरायला जात असेल. इतकेच नाही तर तो आपला फोन तुमच्यापासून लपवून लहान-लहान गोष्टींवर खोटे बोलणे सुरू करेल. जर आपल्याला असेच संकेत मिळायला लागले तर आपण निश्चितपणे आपल्या नात्याबद्दल सावध असले पाहिजे.