मीठाचा 'असा' वापर करून तुम्ही तुमचे घर हे नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवू शकता ,बघा ...

मीठाचा ‘असा’ वापर करून तुम्ही तुमचे घर हे नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवू शकता ,बघा …

आपण मीठ हे फक्त खाण्यातच नव्हे तर घरातील स्वच्छतेसाठी वापरू शकतो. हे एक नैसर्गिक क्लीनिंग एजंट आहे जे डाग काढून टाकण्यास मदत करते. आपल्या घरात मीठ फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठीच वापरला जात पण आपण घर स्वच्छ करण्यासाठी देखील मीठाचा वापर करू शकतो. घरातील घाण स्वच्छ करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. मीठ सोल्यूशन तयार करून, आपण डाग आणि सामनावर जमलेली घाण साफ करू शकतो. हे केवळ रासायनिक उत्पादनापेक्षा फक्त स्वस्त आणि सुरक्षित नाही तर नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली असून घरासाठी पेरफेफ्ट देखील आहे.

आपण घरी कपडे साफ करण्यापासून ते धुण्यासाठी मीठ वापरू शकता. डिटर्जंट्समध्ये बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि लिंबू याचसोबत मीठ हे मुख्य घटक असते. या मदतीने आपण केवळ घरच स्वच्छ करू शकत नाही तर स्वयंपाकघरात तेलकट चिकटलेले डाग काढून टाकण्याची क्षमता देखील आहे. आपण ते कसे वापरू शकता ते आपल्याला सांगतो.

किचन आणि बाथरूम मधील नाली : आपण मीठ वापरुन स्वयंपाकघर किंवा बाथरूमची नाली साफ करू शकता. यासाठी आपण एका कप मीठात बेकिंग सोडा आणि अर्धा कप व्हिनेगर मिसळा. आता ते नालीच्या खाली ओता आणि 10 मिनिटे तसेच सोडून द्या. अशा प्रकारे हळूहळू सगळं पाणी नालीतून निघून जाईल आणि ते पूर्वीसारखेच साफ होईल. याशिवाय सिंकमधून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी मीठ देखील वापरल जाऊ शकत.

स्वयंपाकघरातील डस्टर स्वच्छ करा : आपण स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी डस्टर वापरतो. अशा परिस्थितीत मजला स्वच्छ करण्यासाठी वापरलेला कपडा कालांतराने गलिच्छ होतो. ह्याच कारणाने बरेचसे लोक ते बदलून टाकतात. परंतु आपण इच्छित असल्यास, मीठ वापरुन आपण पुन्हा त्याच कपड्याचा नव्याने वापर करू शकता. यासाठी एक बादलीत एक लिटर गरम पाणी घाला आणि त्यात 4 कप मीठ घाला. आता तो कपडा त्या बादलीत रात्रभर भिजत घालून ठेवा.

मुंग्यापासून सुटका मिळवा : मुंग्या घरात तसेच स्वयंपाकघरातही येतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरतो, पण उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत स्वस्त आणि नैसर्गिक पद्धत अवलंबणे फायद्याचे ठरते. यासाठी आपल्याला फक्त मुंग्यांच्या मार्गावर मीठ शिंपडावे लागेल.

खिडक्या आणि दारे स्वच्छ करा : काचेचे दरवाजे आणि खिडक्या साफ करणे सोपे नाही. अशा स्थितीत प्रथम व्हिनेगर एका बाटलीमध्ये भरा आणि ते दारे आणि खिडक्यांवर शिंपडा आणि ते कोरडे होऊ द्या. आता बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करून पेस्ट बनवा आणि त्याने घसा. शेवटी ते कोमट पाण्याने स्वच्छ करा. अशा प्रकारे आपल्या खिडक्या आणि दारे नवीन दिसतील.

आपली झाडू फार काळ टिकेल : नवीन झाडू वापरण्यापूर्वी बादलीभर गरम पाण्यात मीठ टाकून त्यात झाडू सुमारे 20 ते 30 मिनिटे भिजत ठेवा. नंतर तो वाळण्यासाठी ठेवून द्या, मग वापरायला घ्या. यामुळे झाडू जास्त काळ टिकेल.

प्लास्टिक / काचेच्या बाटली स्वच्छ करा : जर आपल्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटलीचा वास येत असेल तर त्यात एक चमचा मीठ घाला आणि काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर ते पाण्याने धुवून घ्या. यानंतर वास निघून जाईल आणि बाटली देखील चकाचक होईल. याशिवाय काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटलीवर घाण साचली असेल तर ती साफ करता येईल.

फर्निचरवरील डाग पुसून काढा : फर्निचर किंवा टेबल्सवर बर्‍याचदा कसले डाग पडतात. ते पुसून काढण्यासाठी चिमूटभर मीठ घ्या आणि त्यात तेल मिसळा आणि डाग असलेल्या जागेवर टाकून ते घासुन घ्या. यामुळे डाग सहजपणे निघून जातील. याव्यतिरिक्त, बर्‍याच वेळा दूध किंवा तेलकट ग्रेव्ही गॅसवर पडते, ते काढून टाकण्यासाठी मीठ देखील वापरले जाऊ शकते. यासाठी गरम पाणी आणि मीठची पेस्ट तयार करा आणि डाग पडलेल्या ठिकाणी टाकून काही मिनिटे राहू द्या. नंतर ते पाण्याने स्वच्छ करा.

About admin

Check Also

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

बॉलीवुड एक्ट्रेस आलिया इन दिनों अपनी आने वाली फिल्म डार्लिंग्स के प्रमोशन पर जोरों से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *