हिवाळा सुरू होताच, लोक स्वतःला उबदार ठेवण्यासाठी वेगवेगळे आणि नवीन मार्ग अवलंबतात, त्यात गरमा गरम सूप पिण्यामुळे केवळ थंडीपासून आपले संरक्षण होत नाही, तर आपणास निरोगी आणि तंदुरुस्तही ठेवते.
व्हेजिटेबल सूप बर्याच रोगांमध्ये प्रभावी आहे, जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त व्हेजिटेबल सूप पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, हे सूप कमी कॅलरीचे असतात आणि आपल्या पाचनसंबंधी त्रासास दूर करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात. जर आपण दररोज एक वाटी सूप पिल्यास, ते केवळ थंडीमुळे होणार त्रास टाळण्यापासून वाचवणार नाही तर, ते तुम्हाला ऊर्जा देईल, स्नायूंच्या वेदना, पोटात संबंधित आजारांपासून आराम मिळेल.
आपण हिवाळ्यात मशरूम सूप, बीट, पालक, गाजर, टोमॅटो आणि ब्रोकोली सूप किंवा मिक्स वेज सूप असे बरेच प्रकारचे सूप बनवू शकता. सूप सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे, विशेषत: वृद्ध आणि आजारी लोकांसाठी अधिक फायदेशीर असते, जे मुले जेवणात पालेभाज्या, डाळी खात नाहीत, त्यांना सूप देणे चांगले असते.
रिकाम्या पोटी सूप पिल्यास ते त्वरीत शरीरात शोषले जाते, म्हणून सूप सहसा जेवण करण्यापूर्वी प्यायले जाते. हिवाळ्यात सूप पिण्याची उत्तम वेळ संध्याकाळी असते, जेवणाच्या 1-2 तास आधी.चला तर हे आरोग्यदायी तसेच चटकदार मिक्स वेज सूप बनवण्याकरिता आपल्याला काय आवश्यक आहे ते पाहूया.
पत्ता कोबी – १/२ कप बारीक चिरून ,गाजर – १/२ कप, हिरवे वाटाणे – १/२ कप, हिरव्या कांद्याची पात- १/२ कप ,शिमला मिर्ची – १/२ कप , ब्रोकोली – १/२ कप , आले – 1 टीस्पून. , लसूण – 1 टीस्पून. बटर – 1 टीस्पून. कॉर्न फ्लोअर – 1 टीस्पून. काळी मिरी पावडर -1 टीस्पून मीठ – 1 टिस्पून. पाणी – 3 कप लिंबाचा रस – 1 टीस्पून मिक्स व्हेजिटेबल सूप कसा बनवायचा
स्टेप -1 सर्व प्रथम सूपसाठी घेतलेल्या सर्व भाज्या धुवून नंतर बारीक कापून घ्या, नेहमी भाज्या आधी धुवून नंतर कापाव्यात. आणि तेव्हाच सूपमध्ये घाला म्हणजे भाज्यांचे पोषक तत्व टिकून राहतात.
स्टेप -2 आता कुकर किंवा कढई गॅसवर ठेवून ते गरम करा. त्यात बटर किंवा ऑलिव्ह ऑइल घाला.
बटर गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण घालून नंतर चिरलेल्या सर्व भाज्या घाला आणि 3-4 मिनिटे मंद आचेवर परतवून घ्या.
स्टेप -3 भाज्या परतवून घेतल्यावर त्यात पाणी घालून मंद आचेवर 10 मिनिटे झाकून ठेवा.
स्टेप-4 आपण पहाल की भाज्या थोडी शिजल्या असतील आणि सूप घट्ट झाले असेल, आता आपण त्यात कॉर्न फ्लोर टाकू, कॉर्न फ्लोरला 1 चमचा पाण्यात मिसळून टाकावे. सोबत काळी मिरी, मीठ टाकून चांगले ढवळून घ्यावे.
स्टेप -5 आता सूप 5 मिनिटे उकळी येईपर्यंत शिजवा आणि नंतर गॅस बंद करावा. एका बाऊलमध्ये घेऊन सूपमध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावे.