''चेहऱ्यापासून ते टाचांपर्यंतच्या समस्यांवर तुरटी जादूसारखं काम करते,एकदा वापरून नक्की बघा!''

”चेहऱ्यापासून ते टाचांपर्यंतच्या समस्यांवर तुरटी जादूसारखं काम करते,एकदा वापरून नक्की बघा!”

तुरटी ही एखाद्या चमकणाऱ्या दगडासारखी दिसते परंतु त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म लपलेले असतात. यामुळेच त्वचा आणि आरोग्याशी सं बंधित समस्या दूर करण्यासाठी शतकानुशतके तुरटीचा वापर केला जात आहे. तुरटी एक प्रभावी अँटीसेप्टिक आणि अँटिबायोटिक आहे जी त्वचेला सुंदर बनवते.

तुरटीचे त्वचेला होणारे फायदे : तुरटीपासून होणाऱ्या फायद्यामुळे ती सौंदर्य उत्पादनांमध्ये वर्षानुवर्षे वापरली जात आहे. कारण तुरटीमध्ये त्वचा संकुचित करण्याचा गुणधर्म आढळून येतो. तसेच त्वचा घट्ट करण्यास मदत करते. त्वचेच्या संबंधीत समस्या दूर करण्यासाठी तुरटी खूप उपयुक्त आहे. तर आपण तुरटीच्या सौंदर्य फायद्यांविषयी जाणून घेऊया –

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी : चेहर्‍यावरील सुरकुत्या काढून टाकण्यासाठी तुरटीचा तुकडा पाण्यात भिजवून घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. कोरडे झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. सुरकुत्या काही दिवसांत नाहीशा होतील. वयस्कर दिसण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील आपण तुरटीचा वापर करू शकता.

मुरुमांचा डॉक्टर : जर आपण मुरुमांमुळे त्रस्त असाल तर तुरटी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुरटीचामध्ये एस्ट्रिंजेंट गुणधर्म असतात. त्यामध्ये असलेल्या एस्ट्रिंजेंट गुणधर्म मुरुम बरे करण्याचं काम करू शकत. मुरुमांपासून आराम मिळण्यासाठी आपण प्रभावित ठिकाणी तुरटीची पेस्ट लावू शकता. यासाठी तुरटीची पावडर पाण्यात मिसळा. आता ही पेस्ट आपल्या चेहर्यावरील मुरुमांवर लावा. सुमारे 20 मिनिटांनंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. काही दिवसांत मुरुम नाहीसे होतील.

अनावश्यक केस काढातं : अनावश्यक केस काढण्यासाठी पारंपारिकपणे तुरटीचा वापर केला जातो. जुन्या काळात स्त्रिया ओठांवरील अनावश्यक केस काढण्यासाठी तुरटीचा वापर करत असत.

त्वचा डिटोक्स करते : शरीरावर जमलेली घाण आणि जंतू दूर करण्यासाठी, तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणे हा एक चांगला उपाय आहे. असे केल्याने तुमच्या शरीराच्या घामाचा वासही कमी होतो.

रंग उजळतो : होय, तुरटीच्या नियमित वापरामुळे आपण आपल्या त्वचेचा टोन सुधारू शकता. यासाठी चेहरा पाण्याने धुवा, तुरटीचा तुकडा घेऊन आपल्या चेहऱ्यावर फिरव, थोड्या वेळाने पाण्याने तोंड धुवून घ्या. चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी तुरटी एक चांगला उपाय आहे.

आपली इच्छा असल्यास, तुरटीने चेहऱ्याची नियमितपणे मालिश करा किंवा तुरटीच्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. बघता बघता चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग काही दिवसात गायब होऊन जातील.

फाटलेल्या टाचांचा उपचार : क्रॅक झालेल्या टाचांना  तुरटीच्या पावडरने उपचार केला जाऊ शकतो. यासाठी तुरटी आणि थोडे पाणी घ्या ते एका लहान भांड्यात गरम करा . जेव्हा आपण ते गरम करतो तेव्हा ते वितळते किंवा द्रवरूप होते आणि फेस तयार होतो. जेव्हा त्याचे पूर्णपणे बाष्पीभवन होते तेव्हा ते थंड होऊ द्या.

नंतर त्यातील बारीक तुकड्यांची पावडर बनवून खोबरेल तेलात मिसळून पायांवर लावावे. हे लक्षात ठेवा की तुरटी बारीक पावडरच्या स्वरूपातच असली अन्यथा पायांवर लावणे कठीण होऊन जाते. आपल्या फाटलेल्या टाचांना आराम देण्यासाठी हा सर्वोत्तम उपचार आहे.

टीप या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

About admin

Check Also

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

आलिया की फटी हुई जीन्स देखकर उड़ा रहे सब मजाक, देखने वालों की निगाहें वही टिक गई जहां से पैंट फटी थी।

बॉलीवुड एक्ट्रेस आलिया इन दिनों अपनी आने वाली फिल्म डार्लिंग्स के प्रमोशन पर जोरों से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *