हिवाळ्यात आपण सर्वचजण आपला बराच वेळ अंथरुणावर बसून घालवतो. वास्तविक ह बाहेरच्या थंडीपासून वाचण्यासाठी आणि उबदार होण्याचा एक निश्चितच चांगला मार्ग आहे. आपण ब्लँकेट ओढून बसले आहात आणि आपल्या हातात एक कप गरमागरम कॉफी किंवा हॉट चॉकलेट आहे. सोबत वाचण्यासाठी आपल्याकडे आवडते पुस्तक असल्यास तर मग विषयच नाही. हिवाळ्यातील संध्याकाळ घालविण्याचा हा सर्वात चांगला फंडा आहे.
आजकाल लोक घरातूनच काम करत असल्याने बेडरूममध्ये घालवलेल्या जाणाऱ्या वेळात लक्षणीय वाढ झाली आहे. तर, अशात आपण आपल्या बेडरूमची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याचजणांना नक्कीच असे काही उपाय काही पाहिजेत जे त्यांच्या बेडरूमला विंटरप्रूफ बनवू शकतील. तसे, जेव्हा बेडरूममधील थंडी बाहेर ठेवण्याची वेळ येते तेव्हा फक्त हीटरचा वापर आपल्या डोक्यात असतो. परंतु या व्यतिरिक्त आपण आपल्या बेडरूमला इतर अनेक प्रकारे विंटरप्रूफ बनवू शकता. चला तर या लेखात जाणून घेऊया.
रग्सचा आधार घ्या : हिवाळ्यात खोलीपासून थंडी दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रग्स किंवा गालिचा वापरणे. जेव्हा आपण अंथरुणावरुन खाली पाय ठेवतो तेव्हा थंड फरशीमुळे आपल्याला खूप थंड लागते. आपल्याला पादत्राणे घालणे नेहमीच शक्य नसते. अशा परिस्थितीत रग्स वापरा. आपण आपल्या बेडरूमच्या जागेनुसार अनेक प्रकारचे रग वापरू शकता. हे केवळ आपल्या बेडरूमला उबदार बनविण्यातच मदत करत नाहीत तर आपल्या घराची सजावट देखील करतात.
विंडो थेरपी : जर तुमच्या बेडरूमला खिडकी असेल तर बाहेरची थंड हवा नक्कीच तुमच्या खोलीत येईल आणि तुम्ही सतत गारठाल. अशात आपण खिडकीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. बाहेरून येणारी हवा रोखण्यासाठी आपण खिडक्यांना शेड्स किंवा पडदे वापरू शकता.
अंथरुणावर उबदार : बेडमध्ये उबदारपणा राखण्यासाठी लेअरिंग करणे चांगली कल्पना आहे. उदाहरणार्थ, आपण आपल्या अंथरुणावर घालण्यासाठी घोंडगी किंवा रजई वापरू शकता. याशिवाय तुम्ही तिथे बरेच उशा ठेवाव्या. त्याचसोबत कॉटन बेडशीट ऐवजी उबदार बेडशीट वापरा. अशा प्रकारे आपल्याला अंथरुणावर गरम वाटेल.
उबदार ठेवा लाइटिंग : हिवाळ्याच्या मौसमात आपल्याला खोलीत उबदारपणासाठी काही अतिरिक्त उपाय शोधत असतो. अशात आपल्यापैकी बहुतेक लोक हीटर वापरण्यास प्राधान्य देतात. परंतु हे आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. अशा परिस्थितीत आपण असे काही उपाय अवलंबले पाहिजेत, जे नैसर्गिकरित्या खोलीचे तापमान वाढवते. आपण बेडरूममध्ये फायरप्लेस ठेवू शकत नाही. परंतु त्याऐवजी आपण खोलीत मेणबत्त्या वापरू शकता. हे आपल्या खोलीला एक सुंदर देखावा देखील देते. याव्यतिरिक्त खोलीचे रंग देखील एक उबदार वातावरण तयार करतात. तर शक्य असल्यास आपल्या खोलीला सोनेरी, नारंगी आणि लाल रंगांनी रंगवा.