दातांमध्ये वेदना होणे, हिरड्यांमध्ये सूज असणे, हिरड्यांमध्ये कीड लागणे, दातांमध्ये कीड लागणे त्याशिवाय पायरीयाची समस्या म्हणजेच तोंडातून रक्त येणे, तोंडाला अतिशय दुर्गंधी येणे, दात कमकुवत होणे किंवा दातांचे पूर्णत: स्वछ नसणे या प्रकारची कोणतीही समस्या जर तुम्हाला असेल तर आमच्या या माहितीपेक्षा उत्तम माहीती तुम्हाला पूर्ण facebook वर मिळणार नाही. पूर्णत: नैसर्गिक व घरगुती उपायांच्या मदतीने यावर उपाय पहिल्यांदाच तुम्हाला सांगणार आहे. म्हणून शेवटपर्यंत ही माहिती जरूर बघा.
मित्रांनो, नेहमी तुम्ही बघितले असेल, की आजकाल लोकांची जीवनशैली बिघडलेली असल्यामुळे वेळेत लोक दातांची स्वछता २ वेळा करत नाहीत, भोजनात तळकट पदार्थांचे सेवन, मसालेदार पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे मसालेदार पदार्थांमधील मसाला दातांच्या फटीत अडकून राहातो. तुम्ही रात्री दात घासत नाही, सकाळी उठल्यावर दात ब्रश करता पण नुसते ब्रश करून फायदा होत नाही. तुम्ही दातांसाठी पेस्ट कोणती वापरली पाहिजे ते तुम्हाला माहीत नसते.
या सगळ्यांमुळे तसेच चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्यामुळे तुमचे दात हळूहळू वयाच्या बरोबर खराब होऊ लागतात. दुसरे दात खराब होण्याचे कारण म्हणजे ज्या व्यक्ति भोजन सरळ गिळून टाकतात, म्हणजेच भोजन करताना पुर्णपणे त्याकडे लक्ष न देणे. म्हणजेच भोजन चावून खात नाही कारण तुमचे लक्ष दुसरीकडेच असते. जो व्यक्ति भोजन चावून चावून खात नाही त्याचे दात वयाच्या अगोदर लवकर खराब होतात.
दुसरे म्हणजे ब्रश जे लोक खूप जोरात आपल्या दातांवर रगडतात, त्यांचे दात लवकर पडतात, खराब होतात. त्यांनाच पायरीया म्हणजेच दातांमधून रक्त येणे, दातांमध्ये कीड होणे यासारख्या समस्या होतात. दातांना कीड लागत नाही पण ते सडतात म्हणजेच काळे पडतात. आपण दातांची काळजी घेत नाही. जोरात ब्रश केल्यामुळे दातांना इजा होते. जाणून घेऊया ज्यांच्या दातांमध्ये आधीच पायरीया झाला आहे. हिरड्यांना सूज आली आहे, दात सडले आहेत, त्यांनी कोणकोणते घरगुती उपाय केले पाहिजेत ते बघूया. आमची ही माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.
सगळ्यात पहिले पायरीयासाठी घरगुती उपाय बघूया. तुमच्या दातांमध्ये वेदना आहे, तर तुम्हाला लवंग घेऊन ती दातात ठेवायची आहे, किंवा ५ ते ६ लवंगांची पाऊडर करून वेदना होत असेल त्या जागी लावा. साधारण २० मिनिटे लावून ठेवायची आहे. तुम्हाला नक्की आराम मिळेल. ज्यांचे दात पूर्ण सडले आहेत, त्यांच्यासाठी लवंगेचे तेल घेऊन कापसात बुडवून त्या जागी लावले तर खूपच फायदा होतो.
लवंगेच्या तेलाचा तिसरा उपाय आहे ते तेल कोमट पाण्यात टाकून त्याने गुळण्या करणे ५ ते ६ वेळा जेवायच्या आधी व नंतर तर तुमच्या दातांमध्ये कधीही कीड लागणार नाही. पेरूच्या पानांचा प्रयोग आपण कसा करू शकतो ते बघूया. जर पेरूची पाने असतील, तर कोवळी पाने तोडून स्वछ धुवून अगदी हळू हळू चावायची आहेत. कारण पेरूच्या ताज्या पानांमध्ये अॅंटी-बकटेरियल, अॅंटी-फंगल, अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात त्यामुळे दातांच्या वेदानांमध्ये आराम पडतो.
पुढील उपाय आहे कच्चा कांदा. कांद्यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट, अॅंटी-बकटेरियल, अॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व असतात. दातांमधील वेदना असेल, तर एक छोटा कांद्याचा तुकडा दातामध्ये ठेवा. तुम्हाला आराम पडेल. तसेच, मीठ घ्यायचे आहे, ब्रश करताना सेन्सोडाईन पेस्ट घ्या त्यात मोहरीचे तेल मिसळा मीठ घाला व त्याने ब्रश करा. हळू हळू ब्रश करा तुम्हाला आराम मिळेल. २ वेळा ब्रश करा. कधीच दात सडणार नाहीत.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ति हळू हळू भोजन करतील त्यांना याचा जरूर फायदा होईल. आमची माहिती आवडली तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.