नमस्कार मित्रांनो. केसांच्या गळण्यामुळे तुम्ही त्रासलेले आहात, केस तुटत आहेत, केस लांब होत नाहीयेत, तर आजची ही माहिती तुमच्या खूपच उपयोगी पडणार आहे. केस गळती थांबेल व केसांची लांबी पण वाढेल. त्याचबरोबर दोन तोंडे असलेले केस असतील तर ती समस्या पण दूर होईल. आजकाल खूपच कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या बघायला मिळते आहे. पण हा उपाय जर तुम्ही काही दिवस करून बघितला तर पांढर्या केसांची समस्या दूर होईल.
सगळ्यात पहिले केसांच्याकाळजीसाठी इथे मी वस्तु घेतली आहे ती म्हणजे लाल कांदा. हा पांढर्याज कांद्यापेक्षा फायदेशीर असतो आपल्या केसांसाठी. त्यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट्सची मात्रा जास्त प्रमाणात असते, त्याचबरोबर, सल्फर जास्त प्रमाणात असते जी आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. तुम्ही बघितले असेल, की कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी म्हणजेच अश्रु येतात, त्याचे कारण आहे कांद्यामधील सल्फर.
सल्फर आपल्या केसांना पोषक तत्वे देते, घनदाटपणा आणते, केस गळती थांबविते. तुम्ही विचार करीत असाल, की आपण आठवड्यातून २, ३ वेळा केसांना तेल लावतो, पण केवळ तेल लावल्यामुळे केसांना न्यूट्रिशीएंट मिळत नाहीत जे आपण टॉनिकद्वारा देतो. केसांना हेयर टॉनिक देणे खूप जरूरी असते. १ लाल सालीचा कांदा मी इथे बारीक तुकडे करून घेतला आहे. हा कांदा तुम्हाला आता एका भांड्यात घेऊन तो पाणी घालून उकळून घ्यायचा आहे.
आयुर्वेदिक औषधांमध्ये छोट्या लाल कांद्याचा वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधांप्रमाणे काम करतो लाल कांदा. केसांच्या सगळ्या समस्या दूर करतो, तसेच कोलेजन टिस्स्युचे उत्पादन वाढवितो कांदा व केसांची लांबी वाढवितो.याचा वास थोडा उग्र आहे पण उकळून घेतल्यावर वास येत नाही. दुसरी वस्तु तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे धणे. तुम्हाला माहीत नसेल, धणे आपल्या केसांसाठी किती उपयोगी आहेत. तुम्ही धणे या बिया घ्या किंवा हिरवी कोथिंबीर घ्या.
कोथिंबीरीचा रस पण आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा हा रस केसांना लावला तर पांढर्या केसांची समस्या मूळापासून समाप्त होईल व नैसर्गिक काळा रंग येईल. तसेच धणे पण आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेमंद आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात विटमिन्स असतात. धण्यांमध्ये विटामीन के असते, विटामीन सी असते, तसेच विटामीन बी पण असते. यामध्ये मी आता धणे २ चमचे घालणार आहे. आता कांदा, पाणी व धणे उकळत ठेवायचे आहे. आता हे तुमचे हेयर टॉनिक बनणार आहे.
धणे चेहर्यापसाठी पण उपयोगी आहेत. मुलतानी मातीबरोबर हे कुटून लावले तर चांगला फेस पॅक आहे. कोणताही हेयर पॅक लावताना त्यात १ चमचा धणे पाऊडर जरूर घाला. त्यामुळे केसांना चमक येते. मध्ये मध्ये मी हे पाणी ढवळते आहे. आता ह्या सगळ्याची पोषक तत्वे पाण्यात येत आहेत. नंतर हे पाणी गाळून घेणे. हे तुम्हाला आठवड्यातून ३ वेळा लावायचे आहे. हे तुमच्या केसांची मुळे मजबूत करेल.
तुम्ही हे काचेच्या बाटलीत भरून ठेवू शकता. जास्त बनवून फ्रीज मध्ये ठेवू शकता. केस धुण्याच्या आधी २ तास आधी केसांना लावून ठेवा व नंतर केस धुवून टाका. आमची माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करा.