पोट व कंबर याची चरबी वितळवेल हा उपाय. लवकर बारीक होणे, पोट आत जाण्याचे औषध. मित्रांनो, खराब जीवनशैली, खूप कालावधीसाठी एका जागी बसून काम करणे, शारीरिक हालचालींची कमतरता, मानसिक तणाव, चुकीचे खाणेपिणे व अशी अनेक कारणे आहेत जी लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे तुमचा फक्त लठ्ठपणा वाढत नाही, तर वेळेच्या आधी तुम्हाला वृद्धत्व देतो. असे बरेच लोक तुम्हाला मिळतील जे २५ वर्षाचे आहेत पण ३० ते ३५ वर्षाचे दिसतात. ४० वर्षांनंतर ते स्वत:ला वृद्ध समजू लागतात.
मित्रांनो, तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीवर, खाण्यापिण्यावर व जीवनशैलीकडे लक्ष दिले, योगा, व्यायाम याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनविला त्याकडे लक्ष दिले, तर तुमचे शरीर कधीही लठ्ठ,बेढब व वयाच्या आधी वृद्ध दिसणार नाही. तर या संदर्भातील आजची ही माहिती खूप खास आहे, या माहितीद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे.
पोटाची चरबी, लठ्ठपणा, लटकलेले पोट, कमी करण्याचा खूपच परिणामकारक व घरगुती उपचार ज्याच्या मदतीने तुम्ही नैसर्गिकपणे तुमची वाढलेली चरबी कमी करू शकता. ह्या उपायाचा परिणाम खूपच चांगला आहे. लोकांनी तो करून बघून आपले वजन कमी केले आहे. तुम्ही पण करून बघा. त्याचबरोबर आपण महर्षि वाग्भट यांनी सांगितलेले निरोगी आयुष्यासाठी काही नियम पण जाणून घेणार आहोत.
चला वजन कमी करण्याचा उपाय कशा प्रकारे तयार करायचा आहे ते बघूया. यासाठी प्रथम तुम्हाला घ्यायची आहे छोटी पिंपळी याला “लॉन्ग पिपर” पण म्हणतात. मी इथे तुम्हाला दाखविली आहे. याचा प्रयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये जास्त होतो. तुम्हाला कोणत्याही मसाल्याच्या दुकानात ही मिळेल. ही तुमचा मेटाबोलीसम वाढविते. तुमची चरबी बर्न होण्यासाठी याची मदत होते. यामध्ये असलेले अॅंटी-ओकसिडेंट्स आपली पचनशक्ति वाढवितात. त्यामुळे पोटाची चरबी पिघळते. तसेच मधुमेह, वाईट कोलेस्ट्रॉल, कमी करते. मी इथे ४ पिंपळी घेतली आहेत.
दुसरी वस्तु जी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे अळशी (फ्लेक्स सीड्स). अळशीमध्ये ओमेगा ३ फैटि अॅसिड व फायबर यांचे भांडार आहे, जी आपला मेटाबोलीसम वाढविते. यामध्ये ८०० पेक्षा जास्त लेगनेन्स असते जे आपली भूक क्षमवते व आपले पोट भरलेले राहते. त्वचेसाठी, केसांसाठी पण हे उत्तम आहे. मी इथे २ चमचे अळशी घेतली आहे. तिसरी वस्तु आहे बडीशेप. बडीशेप गॅस दूर करते. आपल्या शरीरातून विषारी द्रव्ये बडीशेप बाहेर टाकण्यास मदत करते.
बडीशेपेमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. त्यामुळे पोट भरलेले राहाते. मी २ चमचे बडीशेप घेतली आहे. आता घ्यायचा आहे २ चमचे ओवा. ओवा शरीरात उष्णता निर्माण करतो. ओवा आपल्या पाचकरसाला वाढवितो. ओवा ही पोटासाठी एक रामबाण औषधी आहे. बडीशेप सोडून सर्व गोष्टी तव्यावर हलक्या भाजून घ्यायचे आहे. थंड झाल्यावर बडीशेप त्यात घालून त्याची पाऊडर करा. हे चूर्ण जास्त ठेवू शकता. हे कसे घ्यायचे आहे ते बघूया.
१ टी स्पून घेऊन गरम पाण्यात ते मिक्स करायचे आहे. पाणी कोमट झाले की त्यात अर्धा लिंबाचा रस घाला. नंतर त्यात १ चमचा मध घाला. सकाळी रिकाम्या पोटी शांत बसून घोट घोट करून हे पाणी प्यायचे आहे. हे पेय तुम्ही २० दिवस पिऊन बघा, तुमचे बारीक होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मधुमेही लोक, थायरोइड रुग्ण यांनी सेवन करावे. प्रसूतीनंतर महिलांनी याचे सेवन करावे.
पाणी पिण्याचे नियम जे वाग्भट ऋषींनी सांगितले आहेत ते म्हणजे सकाळी उठल्यावर लगेच कोमट २ ग्लास पाणी प्यायचे आहे. खाताना पाणी पिऊ नका. सारखी भूक लागत असेल, तर मखाना, भाजलेले चणे, अळशी भाजलेले हे खाऊ शकता. लिंबू पाणी पिऊ शकता. आमची माहिती आवडली तर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.