मित्रांनो आजच्या या खास माहितीमध्ये मी तुम्हाला आल्याचे गटागट याच्या पाककृतीबद्दल सांगणार आहे. हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. हे बनविणे खूप सोपे आहे. यामध्ये आपण जितक्या वस्तु वापरू त्या सगळ्या वस्तु आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात मिळतील. चला तर मग अजिबात उशीर न करता जाणून घेऊया आल्याचे गटागट कसे तयार करायचे. मित्रांनो, आल्याचे गटागट बनविण्यासाठी १२५ ग्राम आले मी घेतले आहे. ते स्वछ पाण्याने धुवून घेतले आहे. नंतर त्याची साले काढून घेतली आहेत.
आता आपण ते मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊया. आल्याच्या फायद्यांविषयी बोलायचे झाले तर, आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. याच कारणामुळे ते आपल्या शरीरातील इन्फ्लामेशन म्हणजेच सूज कमी करण्याचे काम करते. ज्या लोकांना एथराईटिसचा त्रास असतो त्यांना शरीराच्या सांध्यामध्ये खूप वेदना होतात. हाडे दुखतात. अशावेळी आल्याचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील वेदना कमी होतात. आल्यामध्ये जिनजिरोल नावाचा एक पदार्थ असतो, जो तोंड्याच्या स्वास्थ्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
म्हणून तुम्ही बघितले असेल की खूप लोक चहामध्ये आले घालून पितात. जेव्हा तुम्हाला हे गटागट बनवायचे असेल तेव्हा मोठे व ताजे आले घ्या. मी इथे सगळे आले चिरून तयार केले आहे. आता ५० ग्रामच्या प्रमाणात आपण खडीसाखर घेणार आहोत. ती मिक्सरवर पाऊडर करून घ्या. नंतर आपल्याला ह्या आल्याच्या तुकड्यांना मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे. थोडेसे पाणी घालून वाटून घ्या. बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे. आता एक कढई मंद गॅस वर ठेवूया. त्यामध्ये सगळी आल्याची पेस्ट टाकून घेऊया.
ती आता शिजायला ठेवूया, मध्ये मध्ये ढवळायचे आहे. आच एकदम मंद ठेवायची आहे. आल्याचा हा गटागट सगळ्या वयाच्या व्यक्ति खाऊ शकतात. मुले गोळी बनवून दिली तर हे जरूर खातील कारण खाण्यासाठी हे खूप स्वादिष्ट असते. आता आल्यातील पाणी हळू हळू कमी होत जाईल. नंतर आपण त्यात १२५ ग्राम गूळ चिरून घालूया. आता दोन्ही चांगले मिक्स करून ढवळत राहा. ४ ते ५ मिनिटे शिजल्यावर त्यामध्ये १/२ चमचे भाजेल्या जिरयाची पाऊडर टाका. १/२ टी स्पून काळी मिरी पाऊडर टाकायची आहे.
१/२ छोटा चमचा काळे मीठ टाकायचे आहे त्यामुळे त्याचा स्वाद खूपच छान येईल. आता आपण यामध्ये १/२ चमचा मीठ घालूया. १/४ चमचा हिंग पाऊडर घालायची आहे. हिंग आपले पचन व्यवस्थित करतो. सगळे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता हे आंबट बनविण्यासाठी यामध्ये ५० ग्राम आमचूर पाऊडर घाला. तुम्हाला कोणत्याही वाण्याच्या दुकानात ही आमचूर पाऊडर मिळेल जी चवीला आंबट असते. पुन्हा सगळे मिक्स करून घ्या. आता आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण थंड करून घेऊया.
आता हाताला थोडी खडीसाखरेची पाऊडर घेऊन छोटे छोटे गोळे तयार करा. यामध्ये आपण ज्या वस्तु वापरल्या आहेत त्या सगळ्या औषधी गुणधर्म असलेल्या वस्तु आहेत व खाण्यासाठी हे गटागट खूपच स्वादिष्ट लागतात. तुम्ही हे वर्षभर साठवून ठेवू शकता. जेवण झाल्यानंतर याची १ गोळी सेवन करा. तुमचे पचन उत्तम होईल.
शरीरात चरबी वाढणार नाही, पचनशक्ति उत्तम होईल. वजन वाढणार नाही. लठ्ठपणा कमी होईल. जे लोक बारीक आहेत, त्यांना खाण्याची रुचि वाढविण्यासाठी ही गोळी खाल्ली पाहिजे. ज्यांना सांधेदुखी आहे, हाडांच्या वेदना आहेत त्यांनी फक्त आमचूर पाऊडर वापरू नका. ही माहिती आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा. धन्यवाद.