तूळ राशीचे लोक हे शांत स्वभावाचे मानले जातात.यांचे राशी स्वामी शुक्र असून या लोकांना मित्र फार असतात.कोणतेही काम मापून तोलून करण्याची सवय असते.वातूळ प्रकृतीचे हे लोक कोणताही निर्णय घ्यायला वेळ लावतात. एखादा निर्णय घेण्यासाठी या लोकांना थोडा वेळ लागतो पण निर्णय घेतल्यानंतर मागे वळून पाहत नाही. ह्या लोकांना जीवनाविषयी खूप रस असतो.यश मिळो अथवा ना मिळो हे समाधानी वृत्तीचे मानले जातात.न्याय निवड करण्यात सक्षम असतात.योग्य न्याय देण्यात खूप हुशार असतात.
हे इमानदार स्वभावाचे भावून वृत्तीचे लोक असतात.प्रेमावर ह्यांचा विश्वास असतो. हे भावनिक मनाचे आणि शब्दावर लगेच विश्वास ठेवणारे लोक असतात. अतिशय कमी पैशामध्ये सुंदर संसार कसा करावा हे तूळ राशीच्या लोकांकडून शिकावे.हे मनाने निर्मल आणि मनमोकळे असतात. ह्यांचा मित्र परिवार खूप मोठा असतो.
मित्रांविषयी ह्या लोकांच्या मनात प्रेम करून आणि विश्वास असतो पण अनेक वेळा मित्र यांच्या विश्वासाला पात्र ठरत नाही . ह्यामुळे बऱ्याच वेळा मैत्री मध्ये याना धोकाच मिळतो. जीवनात प्रगती करण्यासाठी थोडा वेळ घेतात पण एक वेळा जिद्द निर्माण केली कि मग अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवण्याचे बळ ह्यांच्या स्वतःमध्ये असते.
२०२१ हे वर्ष त्रासदायक ठरले असले तरी २०२२ वर्ष अतिशय खास ठरणार आहे. २०२१ पासून जीवनात एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.मागील वर्षात राहून गेलेली कामे येणाऱ्या वर्षात पूर्ण होतील मागील काळात आलेले अनुभव आता उपयोगी पडणार आहे.कोणीही कोणाचे नसते यावर आता तुमचा विश्वास बसेल.त्यामुळे इथून पुढे सावधगिरी बाळगाल.
मैत्रीची एक सीमा असते आणि मित्र त्या सीमेपर्यंत राहिलेले बरे.जगात पैशाशिवाय काहीच नाही.याचाही अनुभव आता तुम्हाला येणार आहे.जगात चांगले सुद्धा लोक आहे पण ते तुमच्या वाटेल येणार असे नाही. या उलट तुमच्या चांगुलपणाचा अनेक जणांनी फायदा घेतला आहे. २०२१ हे वर्ष तुमच्या जीवनासाठी अतिशय महत्वपूर्ण रहाणार आहे.
तुमचा राशी स्वामी शुक्र हा तुमच्यावर भरभरून कृपा करणार आहे.त्यामुळे या काळात धन संपत्ती आणि वैभव सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.नोकरीचे योग्य बनत आहे.ह्या काळामध्ये प्रेम प्राप्तीचे योग्य बनत आहेत. कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही.तुमच्या आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्टी कोणालाही सांगू नका.२०२१ चे वर्ष तुमच्या साठी सुख समृद्धीने भरून असणार आहे.