मित्रानो 2021 हे वर्ष आता समाप्त होत आहे. हे वर्ष सर्वांसाठीच खूप अवघड गेले आहे. या वर्षातील आठवणी खूप दुःखदायक आहेत. मित्रानो या वर्षातील सर्व आठवणी दुःखे इथेच ठेऊन आपल्याला नवीन वर्षाची सुरवात नव्याने करायला हवी.पैसे कमावण्यासाठी नवीन नवीन उपाय करायला हवे. म्हणूनच आम्ही घरातीलच असा उपाय घेऊन आलो आहेत जर तुम्ही आहे छोटासा उपाय केला तरी तुम्हाला 2022 हे सुखाचे भरभराटीचे जाईल.आज आपण जाणून घेणार आहोत. कॅलेंडर ची घरात कोणत्या दिशेला असावे. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे घड्याळ दुसरे म्हणजे कॅलेंडर.
मित्रांनो आपला दिवस आपली वेळ कशी जाणार हे या दोन गोष्टी ठरवत असतात. आपला दिवस आणि वेळ शुभ जाण्यासाठी या दोन गोष्टी योग्य ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे कॅलेंडर.प्रथम कॅलेंडर कोणत्या दिशेला लावू नये हे आपण पाहूया. आपल्या घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नये. दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा असल्याने नकारात्मकता जास्त असते.
या दिशेला कॅलेंडर लावल्याने अशुभ घटना घडतात. वारंवार पैशाच्या अडचणी उभ्या राहतात. दरवाज्याच्या पुढे किंवा मागे कॅलेंडर लावू नये. ज्या गोष्टी आहेत त्या या दरवाज्यातून येत असतात. म्हणून या दोन ठिकाणी कॅलेंडर लावू नये.
आता हे कॅलेंडर कुठे लावायचे? तुमच्या घरात पैशाची तंगी असेल. लक्ष्मी स्थिर होत नसेल तर उत्तर दिशेला कॅलेंडर लावणे योग्य आहे. आपल्या घरात पैसा येतो पण तो विनाकारण वाया जात असेल तर पश्चिमेला कॅलेंडर लावावे त्यामुळे आपला पैसा टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही.कॅलेंडर पाहत असताना आपल तोंड दक्षिण दिशेला नसावं. उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्याने आपले तोंड उत्तरेला असते. पैसा येत नसेल तर उत्तर दिशा आणि पैसा टिकत नसेल तर पश्चिम दिशा.
सामाजिक कार्य करत असाल तर पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे. आरोग्य चांगले राहात नसेल तर पूर्वेला कॅलेंडर लावावे. नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर उत्तर दिशेला कॅलेंडर लावावा. कॅलेंडर खरेदी करताना कॅलेंडर वर वन्य किंवा हिंस्त्र प्राण्यांचे चित्र नसावे. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील लोक एकमेकांशी लहान लहान गोष्टी वरून भांडतात.
कॅलेंडर वर रडणारे, उदास चेहरे नसावे. त्यामुळे घरात वास्तू दोष उत्पन्न होतात. त्यामुळे कॅलेंडर घरात लावत असताना या गोष्टींची काळजी आवश्य घ्यावी. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.