पायाला भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. काहीजणांना पायाला भेगा पडल्यामुळे जखमा होऊन त्याठिकाणी वेदना व रक्तस्रावही होत असतो. विशेषतः हिवाळ्यात पायाला भेगा पडण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असतो. पायाला भेगा पडणे यावर उपाय यांची माहिती खाली दिली आहे. निसर्गामध्ये अशा काही औषधी वनस्पती आहेत त्या वनस्पतीच्या आधारे आपण आपल्या जीवनातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करू शकतो.
अशी काही झाडे,वनस्पती,झुडपे आहेत त्यांच्या वापराने आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो परंतु अनेकदा आपल्याला आजूबाजूला असणारे वनस्पती बद्दल फारशी माहिती नसते आणि परिणामी आपण त्या वनस्पतीच्या उपयोगाने आपले आयुष्य समृद्ध करू शकत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या वनस्पतीच्या आधारे तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये जर पायाच्या भेगा निघाल्या असतील तर त्या पूर्णपणे दूर करू शकणार आहात चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला त्वचा संदर्भातील विविध आजार उद्भवत असतात कारण की या दिवसांमध्ये वातावरणामध्ये थंडी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि परिणामी आया शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होताना सुद्धा पाहायला मिळतो. अनेकांना हातापायांना मुंग्या येणे, ओठ फाटणे, हाता पायांना तडे जाणे, पायांना भेगा येणे, यासारख्या विविध समस्या उद्भवत असतात म्हणूनच आज आपण एका वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत. ही वनस्पती आपल्या आजूबाजूला प्रामुख्याने आढळून येते, त्या वनस्पतीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या वनस्पतीचे म्हणजेच झाडाचे नाव आहे पिंपळ पिंपळ या झाडाला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहेच पण त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रामध्ये अध्यात्मिक दृष्टीकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे.
पिंपळाचे झाड सगळीकडे उपलब्ध असते असे एखादे गाव किंवा जागा असेल की जेथे पिंपळाचे झाड नसणार. पिंपळाची झाडे सर्वात जुने झाड मानले जाते आणि म्हणूनच या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. या वृक्षाच्या खालीच भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि म्हणूनच या वृक्षाला बोधिवृक्ष सुद्धा म्हटले जाते. या वृक्षाचा विशाल आकारमानामुळे किंवा विस्तीर्ण शाखा मुळे या वृक्षाला जगभरामध्ये ओळख मिळालेली आहे. या वृक्षाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत आजच्या लेखामध्ये आपण अशाच काही समस्या बद्दल जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांच्या समस्या असतात, चेहऱ्यावर सुरकुत्या काळे डाग, पिंपल्स आलेले असतात तसेच अनेकांना हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, कफ यासारख्या समस्या उद्भवत असतात तसेच या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पायांना भेगा येणे या सगळ्या गोष्टी समस्या प्रामुख्याने उद्भवत असतात म्हणूनच पिंपळाच्या सहाय्याने आपण या सगळ्या समस्या लवकरच नष्ट करणार आहोत.
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या आल्या असतील तर अशा वेळी आपल्याला पिंपळाच्या झाडाची साल सुकवून त्याची पावडर बनवायची आहे आणि या पावडर चा लेप बनवून आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे असेच काही दिवस केल्याने आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग सुरकुत्या पूर्णपणे निघून जाणार आहे. पिंपळाच्या सालीमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात त्यांच्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर त्या पूर्णपणे निघून जातात त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना दाताच्या समस्या उद्भवत असतात.
अनेकांचे दात काळे, लाल झालेले असतात आणि हे दात स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना सुद्धा आपण करतो तसेच आपण पिंपळाच्या सालीचा वापर करून दात स्वच्छ करू शकतो यासाठी आपल्याला पिंपळाची साल व काळी मिरी पावडर एकत्र करून या मिश्रणाने दात घासायचे आहे असे केल्याने आपले दात तर स्वच्छ होणार आहे पण त्याचबरोबर म्हातारपणामुळे तुमचे दाताचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार आहे. जर तुमच्या पायांना भेगा पडल्या असतील तर अशा वेळी या पिंपळाच्या पाना मधून जो पांढरा द्रव्य पदार्थ बाहेर पडतो, तो पांढरा द्रव्यपदार्थ पायांच्या भेगा लावल्यास काही दिवसांमध्ये त्वरित फरक जाणवतो आणि त्याचबरोबर आपल्या पायाच्या भेगा तर नष्ट होतात पण आपल्या पायाची त्वचा सुद्धा मुलायम बनते आणि भविष्यात आपल्याला पुन्हा कधीच भेगा येत नाही म्हणूनच जर तुमच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड असेल तर हा उपाय अवश्य करा आणि नैसर्गिक रीत्या आपल्या पायांचे रक्षण करा.