बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी एकेकाळी एकमेकांवर खूप प्रेम केले होते परंतु हे जोडपे कधी एकत्र जमले नाहीत बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत जी बॉलिवूड कॉरिडोरमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी च्या जोडीने बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे यादरम्यान हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या जोडीचा शेवट झाला पण आजही चाहत्यांना शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला आवडत.
शिल्पा शेट्टीच्या ब्रेकअपनंतर अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले आणि आज ते दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत तर शिल्पाने कोट्याधीश व्यापारी असलेल्या राज कुंद्राशी लग्न केले आहे. लग्नानंतर शिल्पा शेट्टीने बॉलिवूड इंडस्ट्रीला निरोप दिला पण ती अजूनही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे. आपल्या सर्वांना हे समजले असेल की ती सुपर डान्सर सारख्या प्रसिद्ध शोची जज आहे.
अलीकडेच या शोमध्ये शिल्पा शेट्टी एका सिमरी गाऊनमध्ये दिसली होती ज्यात ती एका परीपेक्षा कमी दिसत नव्हती. या फोटोज मध्ये शिल्पा शेट्टी कमीतकमी मेकअप आणि क्राउन लावून ती कहर करीत आहे. शिल्पा शेट्टी वय 43 वर्षांची आहे पण तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज करणे कठीण आहे ती बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. तिची फिटनेस खरोखरच अप्रतिम आहे.
राज कुंद्रा सोबत तिला खूप वेळा पाहिले जात आहे आणि ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे. नुकतेच मदर डेच्या दिवशी शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले असून त्यामध्ये ती आपल्या आई आणि मुलासमवेत दिसली होती शिल्पा शेट्टी नेहमीच वेग वेगळ्या लूकमध्ये दिसत आली आहे आणि तीचे फोटोशूट सोशल मीडियावर देखील व्हायरल जाते.
तीचे खूप चाहतेही आहेत.शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन या अभिनेत्री सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसल्या तरीही त्या अनेकांच्या फेव्हरेट लिस्ट चा एक भाग आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत काही अफलातून चित्रपटांमधून झळकलेल्या या दोन्ही अभिनेत्रींची लोकप्रियता सध्याही कायम आहे. अशा या दोघींना एकत्र पाहण्याची संधी नुकतीच प्रेक्षकांना मिळाली. सुपर डान्सर २ या रिअॅलिटी शोमध्ये या दोन्ही अभिनेत्रींचा एकत्र पाहण्याची संधी मिळाली. त्यावेळी अभिनेता गोविंदासुद्धा उपस्थित होता.
सुपर डान्सर २ या कार्यक्रमात रवीना आणि शिल्पाच्या मैत्रीची अनोखी बाजू पाहायला मिळाली. पण त्यांच्या एका वक्तव्याने बऱ्याचजणांना पेचात पाडले. स्पॉटबॉय ई ने सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रवीनाने ज्यावेळी आपणही आयुष्यात बऱ्याच चुका केल्या आहेत असे वक्तव्य केले तेव्हा शिल्पानेही मध्येच तिचे मत मांडले. आमच्या काही चुका एकसारख्याच होत्या असे शिल्पाने स्पष्ट केले तेव्हा त्या दोघीही खळखळून हसल्या.
कार्यक्रमात सुरु असणाऱ्या गप्पांच्या ओघातच सर्वजण त्यांच्या आयुष्यात झालेल्या गोंधळाविषयी बोलत होते. तेव्हाच रवीना पुढे म्हणाली आयुष्यात अशा काही गोष्टी केल्या आहेत. असे म्हणत रवीनाने शिल्पाकडे सूचक नजरेने पाहिले. तुझ्या लक्षात आलंय ना मला काय म्हणायचे आहे ते? असा प्रश्न तिने शिल्पाला विचारला. शिल्पा आणि रवीनामध्ये सुरु असणाऱ्या या गप्पांचा रोख अभिनेता अक्षय कुमारकडे असल्याचे म्हटले जाते. ९० च्या दशकात अक्षय कुमारसोबत रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टीचे नाव जोडले गेले होते.
एक काळ असाही होता जेव्हा या दोन्ही अभिनेत्रींसोबत अक्षयच्या रिलेशनशिपच्या चर्चा वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये रंगू लागल्या होत्या. पण त्यावेळी ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्याचा निर्णय घेत खिलाडी कुमारने या सर्व प्रकरणांना पूर्णविराम दिला होता. त्या गोष्टीला सध्या बराच काळ लोटला असला तरीही त्याविषयीच्या अनेक चर्चा आजही रंगल्याचे पाहायला मिळते.