आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला महेश भट्टविषयी काही धक्कादायक रहस्ये सांगणार आहोत. आपणास असे वाटेल की बॉलिवूड जग खूपच स्वच्छ आणि चांगले आहे. पण प्रत्यक्षात बॉलिवूडचे जग असे नाही. बाहेरून रंगीबेरंगी दिसणारी बॉलिवूडची दुनिया आतून खूप काळी आहे. बॉलिवूडची रहस्ये समजल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतील.
बॉलिवूड स्टार लोकप्रिय होण्यासाठी काहीही करतात. पण त्यांना याचा त्रास ही सहन करावा लागला आहे. प्रसिद्ध स्टार महेश भट्टबद्दल आपणा सर्वांना माहिती असेल. तो एक उत्कृष्ट चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे.
बॉलिवूडमध्ये महेश भट्ट या नावाने आपलं एक वेगळं स्थान कायम केलं आहे. त्यांचे सिनेमे हे कायम प्रकाश झोतात राहीले आहेत. त्यांच्या सिनेमांची जितकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता आहे तितकंच त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील कायम चर्चेत राहीलेलं आहे.
महेश भट्ट हा बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक मानला जातो. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महेश भट्ट चा सारांश चित्रपट दर्शविला गेला. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
महेश भट्ट अतिशय रंगीन स्वभावाचा माणूस आहे. एकदा त्याला मोठ्या वादा चा सामना करावा लागला. असं झालं की एका मासिकाच्या मुखपृष्ठावर महेश भट्ट आणि त्यांची मुलगी पूजा भट्ट यांचा एक फोटो छापलेला होता.
त्यात फोटोत महेश भट्ट आपली मुलगी पूजा भट्टसोबत लीप लॉक करताना दिसले. हळूहळू हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे ठरले आणि मोठा वाद निर्माण झाला.
हा वाद संपवण्यासाठी महेश भट्ट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पूजा भट्ट माझी मुलगी नसती तर मी तिच्याबरोबर लग्न केले असते. पण त्यानंतर हा वाद आणखी वाढला. त्यानंतर नंतर महेश भट्ट यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांत झालेल्या वादामुळे मी नैराश्यात गेलो. यामुळे मी असे विधान केले. आम्ही सांगतो की महेश भट्टचा जन्म मुंबईत झाला होता.
महेश भट्ट यांचे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. पण तो आपल्या वडिलांपासून दूरच राहिला कारण त्याला असे वाटते की तो आपल्या वडिलांचा बेकायदेशीर मुलगा आहे. मुंबईतंच त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांनी फार कमी वयात कामाला सुरुवात केली.
शाळेत असतानाच महेश भट्ट यांनी उन्हाळाच्या सुट्टीत नोकरी करायला सुरुवात केली होती. तेव्हाच त्यांचा या ग्लॅमरस दुनियेशी संपर्क झाला. या सुट्ट्यांमध्ये भट्ट अॅड्स सुद्धा बनवत. अवघ्या २६व्या वर्षी म्हणजे १९७४ साली त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं ते मंजिले और भी हैं या बॉलिवूड सिनेमातून.
या सिनेमात अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेता विनोद खन्ना मुख्य भूमिकांमध्ये झळकले. या त्यांच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाने कमाल केली आणि त्या वर्षी २ फिल्मफेअर अवॉर्डवर आपलं नाव कोरलं.
त्यानंतर काय महेश यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांच्या बॉलिवूड करिअरची गाडी जोरदार निघाली जी आजवर एकदम दमदार सुरु आहे. त्यानी पुढे सारांश सडक आशिकी जख्म दिल है की मानता नही राज मर्डर हे आणि असे अनेक एकापेक्षा एक उत्तमोत्तम सिनेमे दिले.
१९७७ दरम्यान महेश भट्ट आणि परवीन यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. या दोघांनी आपलं हे नातं पुढे जगासमोर कबुल केलं. त्यानंतर हे दोघं त्या काळी लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू लागले होते
. पण यात सुद्धा पुन्हा नवीन वळण आलं. १९७९च्या दरम्यान परवीन यांना पॅरनॉईड स्क्रिझोफेनिया या आजाराने गाठलं. परवीन यांची तब्येत दिवसेंदिस खालावत होती. त्यांना सतत भिती असायची की त्यांना कोणीतरी मारुन टाकणार आहे.
या कठीण काळात भट्ट परवीन यांच्या पाठीशी खंबीर उभे होते. त्यांच्या उपचारासाठी ते परवीन यांना बंगळुरूला पण घेऊन गेले. पण तरीही परवीन यांच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती. अखेर फिलॉसफरच्या सल्ल्यावर भट्ट परवीन यांच्यापासून वेगळे झाले