अ-श्लील कंटेंट प्रकरणात राज कुंद्राला सपोर्ट करणारी अभिनेत्री गेहना वसिष्ठ आणि रोवा खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वास्तविक, पोलिसांनी अश्लील फिल्म प्रकरणी बळी ठरलेल्या दोघांचे जबाब जाहीर केले आहेत. या पीडितांनी गेहना वशिष्ठ आणि रोवा खान यांच्यावर धमकावण्याचा तसेच जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप केला आहे. मड आयलंडवरील बंगल्यात आमची शूटिंग करण्यात आली, असे दोन्ही मुलींचे म्हणणे आहे.
पहिल्या पीडितेने रोवा खानवर जबरदस्तीने अश्लील चित्रपट शूट केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने म्हटले आहे की, 2018 मध्ये मी रौनक नावाच्या कास्टिंग डायरेक्टरला भेटले, ज्याने मला रोवासोबत एका प्रोजेक्टमध्ये काम दिले. २ फेब्रुवारी २०२१ रोजी रौनकने मला मालाडला भेटायला बोलावले. रोवा आणि रौनक एकाच गाडीतून आले आणि मग मला मड बेटावरील बंगल्यात घेऊन गेले. त्यानंतर रोवाने मला २५,००० रुपयांची स्क्रिप्ट दिली आणि बोल्ड ड्रेस घालण्यास सांगितले. ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी हे करू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
रोवाच्या म्हणण्यानुसार, मोठा ब्रेक मिळण्याआधी हिरोइन्सना अशा गोष्टी कराव्या लागतात. यानंतर मुख्य अभिनेता भानूनेही मला सांगितले की, अशा चित्रपटात काम करण्यात काही नुकसान नाही. अर्ध्या चित्रपटाच्या शूटिंगनंतर मला न्यू-ड सीन करण्यास सांगण्यात आले. मी म्हणाले की मी न्यूड सीन करू शकत नाही, मग रोवा मला धमकावू लागली. जर मी तिचे ऐकले नाही तर ती माझ्यावर गुन्हा दाखल करेल, असे रोवाने सांगितले. एवढेच नव्हे तर नुकसानीचे पैसे तर भरावेच लागतील, तसेच शुल्कही मिळणार नाही. त्यानंतर दबावाखाली मी न्यू-ड सीन्स केले.
त्याच वेळी, आणखी एका पीडितेने गेहाना वशिष्ठवर आरोप केला की, तिला वेब सीरिजच्या शूटिंगच्या नावाखाली मड आयलंडवर बोलावण्यात आले आणि 10,000 रुपयांची ऑफर देण्यात आली. इथेच ज्वेलला भेटले. मला सांगण्यात आले की ही वेब सिरीज राजा, राणी आणि थ्री ड्वार्फवर आधारित आहे. शूटिंगदरम्यान मला जबरदस्तीने एका खोलीत नेण्यात आले आणि तीन जणांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर गेहनाने मला नवीन कपडे दिले आणि शूटिंगला जाण्यास सांगितले, मी नकार दिला.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, यावर गेहना मला धमकावत म्हणाली – शूटिंगवर लाखो रुपये खर्च झाले आहेत आणि जर तू हे सोडले तर तुला पूर्ण पैसे द्यावे लागतील. यानंतर मी घाबरून म्हणाले की माझ्याकडे इतकी मोठी रक्कम नाही. त्यानंतर आकाश नावाचा मुलगा तेथे आला आणि त्याने माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर मी गेहनाला मला जाऊ देण्यास सांगितले आणि तिने मला धमकी दिली की, जर मी शूटबद्दल काही सांगितले तर ते ठीक होणार नाही.