बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न केल्यानंतर बॉलिवूडला अलविदा केले. त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर त्यांच्या व्यावसायिक जीवनावर वर्चस्व गाजवू दिले नाही. यापैकी काहींनी पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतरही त्यांच्या करिअरला ब्रेक लावला नाही. तर आज आम्ही तुम्हाला अशाच 6 अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.
1. अर्चना पूरन सिंह : अर्चना पूरण सिंह यांनी दोन लग्न केले. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर 1992 मध्ये तिने परमीत सेठीसोबत दुसरे लग्न केले. त्यांना आर्यमन आणि आयुष्मान ही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतरही ती चित्रपटांमध्ये काम करत आहे. याशिवाय ती टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो द कपिल शर्मा शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.
2. रेणुका शहाणे : ‘हम आपके है कौन’मध्ये सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारून रेणुका शहाणे घरोघरी प्रसिद्ध झाली. रेणुकाने दोन लग्नेही केली आहेत. तिचे पहिले लग्न मराठी रंगभूमीचे लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झाले होते, पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने अभिनेता आशुतोष राणासोबत लग्न केले. त्यांना शौर्यमान आणि सत्येंद्र ही दोन मुले आहेत. रेणुका अजूनही बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.
3. राखी : राखीने पहिले लग्न 1963 मध्ये अजय बिस्वाससोबत केले होते पण दोन वर्षांनी 1965 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने १९७३ मध्ये गीतकार गुलजार यांच्याशी लग्न केले.
लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पतीपासून विभक्त झाल्यानंतरही राखीने चित्रपटांमध्ये काम करणे सुरू ठेवले.
4. श्वेता तिवारी :श्वेता तिवारीने दोनदा लग्न केले आणि दोन्ही वेळा घटस्फोट घेतला. 1998 मध्ये तिने पहिले लग्न राजा चौधरीशी केले. तिने 2007 मध्ये राजापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत लग्न केले आणि 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान, श्वेताने कधीही काम करणे सोडले नाही.
5. मल्लिका शेरावत : मल्लिका शेरावतने 1997 मध्ये करण गिलसोबत लग्न केले, मात्र काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मल्लिकाने मर्डर, वेलकम, डबल धमाल यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
6. चित्रांगदा सिंग : अभिनेत्री चित्रांगदा सिंगने 2001 मध्ये गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले. 2104 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा आहे. घटस्फोटानंतरही चित्रांगदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे.