टायगर श्रॉफचा हिरोपंती हा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट ठरला आहे. पण आता याच चित्रपटाचा रिमेक ‘हिरोपंती-2’ 29 एप्रिलला रिलीज झाला आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाकडूनही लोकांना खूप मोठ्या आशा आहेत.
टायगरचा ऍक्शन अवतार पुन्हा एकदा काम करेल की नाही, हे रिलीजनंतरच सर्वांला कळालेच आहे. परंतु सध्या टायगर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होता. यावेळी तो मुंबईतील माहीम येथील दर्ग्यात पोहोचला आहे.
टायगरसोबत त्याची हिरोईन तारा सुतारियाही त्याच्यासोबत दिसली होती. दोघांनीही दर्ग्यात नमाज पढून आपल्या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केलेली आहे. यादरम्यान त्यांनी मीडियाला अनेक पोजही देऊन फोटोज काढले आहे. त्याचा हा विडिओ पण पाहायला मिळत आहे.
ज्यामध्ये तो दर्ग्यावर पुष्पगुच्छ अर्पण करत असतांना दिसत आहे. परंतु अनेक नेटिजंसला त्याची ही शैली अजिबात आवडलेली नाही. अशा परिस्थितीत एकाने त्याच्या चित्रपटाला वर्षातील फ्लॉप चित्रपट असे देखील म्हटले आहे.
आशिषसंचित नावाच्या एका युजरने फ्लॉप ऑफ द इयर, जय श्री राम लिहिले आहे. त्याचवेळी एका युजरने हा चित्रपट सर्वांनी पाहू नये असे आवाहन देखील केले आहे. एका युजर रॉकी भाईने असे लिहिले आहे की, चित्रपट फ्लॉप होण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा तुमचासोबत आहे.
टायगर श्रॉफ आणि तारा देखील दर्ग्याच्या नंतर मंदिरात गेले असले तरी. हे दोघेही दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात गेले होते. पण इथेही ट्रोलर्सनी टायगरचा धीर सोडला नाही. एका युजरने लिहिले की, चित्रपट रिलीज होणार असल्यावरच देवाची आठवण येते.
तर एकाने असेही लिहिले आहे की, हे कलाकार मिळून आम्हाला मूर्ख बनवत आहेत. वास्तविक, टायगर प्रत्येक चित्रपटापूर्वी नेहमीच धार्मिक स्थळांना भेट देत असतो. हिरोपंतीच्या पहिल्या भागात टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री कृति सेनन दिसली होती.
View this post on Instagram