आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी म्हणून ओळखली जाते. त्यांच्या लग्नाला 11 वर्षे झाली असून त्यांना जिजा नावाची 4 वर्षांची मुलगी आहे. पूर्वी कोठारे कुटुंबाकडे गोड आणि आदर्श कुटुंब म्हणून पाहिले जायचे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या सुंदर कुटुंबात काहीतरी गडबड होताना दिसत आहे. आदिनाथ आणि उर्मिलाचा सुखी संसार कोणी पाहिला नाही. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, उर्मिला आणि आदिनाथ यांच्यात सुरू असलेल्या भांडणानंतर उर्मिलाने आता कोठारे कुटुंबापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. उर्मी आता तिच्या मुलीसह त्याच इमारतीतील दुसऱ्या घरात शिफ्ट झाली आहे. जिजाची सध्या आदिनाथचे आई-वडील देखरेख करत आहेत.
दोघांमध्ये अंतर का आहे? : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला आणि आदिनाथ यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून काहीतरी गडबड सुरू आहे. पण कुटुंब आणि चित्रपटसृष्टीत मोठे नाव असल्याने दोघेही एकत्र दिसले. पण प्रत्यक्षात त्यांच्यातील मतभेद ‘चंद्रमुखी’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरू झाले.
खरे वैचारिक मतभेद तिथूनच सुरू झाले. घरातील वरिष्ठ दोघांची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिलाने आदिनाथचे घर सोडले आहे. मात्र, आता ती आपल्या मुलीसह कोठारे कुटुंबाच्या त्याच इमारतीतील दुसऱ्या घरात राहायला गेली आहे.
अनेकदिवसांपासून आदिनाथ-उर्मिलामध्ये काहीतरी बिनसले आहे असं अनेकांना वाटत होते, याचं कारण म्हणजे, नुकत्याच काही दिवसांपूर्वी उर्मिलाचा वाढदिवस झाला मात्र तेव्हा आदिनाथने उर्मिलाला शुभेच्छा दिल्या नाहीत. इतकचं नव्हे तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपटच्या कोणत्याच प्रमोशनमध्ये उर्मिला दिसली नाही.
तसेच, आता अचानक, 12 वर्षांनंतर, उर्मिलाने तिचे छोट्या पडद्यावर पदार्पण कोठारे व्हिजन या होम प्रोडक्शनमधून नाही तर दुसर्या प्रोडक्शन हाऊसमधून केले आहे. आदिनाथ सध्या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे म्हटले जात असले तरी उर्मिला सध्या तिच्या नवीन मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
त्यामुळे दोघेही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, त्यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले आहे.