मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतची सर्वात बो*ल्ड वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही वेबसिरीज मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच हादरवून टाकेल. दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवीन विषय घेऊन येत आहेत. पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हा टीझर पाहून हे स्पष्ट झाले आहे की, हा मराठी सिनेमातील आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर आहे. सत्य घटनांच्या संदर्भावर आधारित या वेब सिरीजमध्ये तुम्हाला असे काही पाहायला मिळेल जे तुम्ही याआधी कधीही पाहिले नसेल.
‘रानबाजार’ मालिकेचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये प्राजक्ता माळी खूप बो-ल्ड आणि इंटि*मेट सीन्स देत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुरू असल्याचं या टीझरच्या पार्श्वभूमीवर झळकलं आहे.
पोस्ट शेअर करताना तिने कॅपेंशन लिहले आहे कि, प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही.
लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.
माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल our captain of the ship @abhijitpanse व मराठीतील सगळ्यात मोठी वेब सिरीस बनवल्याबद्दल @planetmarathiott @akshaybardapurkar ह्यांचे आभार. १८ तारखेला ट्रेलर येतोय, २० तारखेला मालिका येत आहे.
आतापर्यंत माझ्यावर व माझ्या कामांवर जसं प्रेम केलत, जो पाठींबा दिलात; तसाच या ही web Series ला द्याल अशी आशा व्यक्त करते. तुमचीच प्राजक्ता…
या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता माळीसोबत तेजस्विनी पंडितही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळेच प्रेक्षक या वेबसीरिजची वाट पाहत आहेत, ही मराठी इंडस्ट्रीतील आतापर्यंतची सर्वात बो*ल्ड वेबसीरिज असेल, असे बोलले जात आहे.
प्राजक्ता माळी ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिका उद्योगात काम करते. तिचा जन्म 8 ऑगस्ट 1989 रोजी पंढरपूर, महाराष्ट्र, भारत येथे झाला. तिचे वडील माजी तपास अधिकारी आहेत आणि तिची आई श्वेता माळी गृहिणी आहे.
तिला प्रसाद माळी नावाचा भाऊ आहे. तिने एक अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 2011 मध्ये सुवासिनी या मराठी मालिकेद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने चित्रपट क्षेत्रातही पाऊल ठेवले आणि 2013 मध्ये खो-खो या मराठी चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
View this post on Instagram