'रानबाजार'मध्ये प्राजक्ताचा से. क्स सिन पाहून, तिची आई म्हणाली.....

‘रानबाजार’मध्ये प्राजक्ताचा से. क्स सिन पाहून, तिची आई म्हणाली…..

मराठी कलाविश्वात गेल्या काही वर्षांत अनेक धाडसी विषय हाताळले गेले आहेत आणि त्याच धर्तीवर कलाकृतीही निर्माण झाल्या आहेत. अनपेक्षित किंवा दुर्लक्षित राहिलेले मुद्दे कलाकार आता प्रकाशझोतात आणताना दिसतात.

‘रानबाजार’ हे असेच एक उदाहरण आहे. ही एकच मालिका सध्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चर्चेत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे त्यामध्ये असणारं कथानक. मग तो टीझर असो वा ट्रेलर. या मालिकेच्या प्रत्येक झलकाने प्रेक्षकांच्या मनात अनेक कुतूहलाचे प्रश्न निर्माण केले.

रानबाजारच्या टीझरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी  याआधी कधीही न पाहिलेल्या बो-ल्ड लूकमध्ये दिसली आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या सीनमध्ये ती इंटिमेट सीन देताना दिसली आणि काही क्षणांसाठी प्रेक्षकांचाही यावर विश्वास बसला नाही.

प्राजक्ताने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका पाहता तिचा हा लूक अनेकांसाठी अनपेक्षित होता. पण, तिच्या या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. प्राजक्ता एका वेश्येची भूमिका करताना दिसली होती, तर तिच्या आईनेही तितकाच महत्त्वाचा प्रतिसाद दिला होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने आईची प्रतिक्रिया जगासमोर उघड केली. माझी आई माझ्यापेक्षा धाडसी आहे. माझ्यात आणि कलाकारातला फरक तिला माहीत आहे. खरे तर या मालिकेपूर्वी मी तिची परवानगीही घेतली होती. एक कलाकार म्हणून तिने मला या भूमिकेसाठी परवानगी दिली,’ असं ती म्हणाली.

प्राजक्ताने तिच्या आईला भूमिका, कथा आणि पात्रांची माहिती दिली. त्याचवेळी आईच्या प्रतिप्रश्नाने प्राजक्ताचे डोळे चमकले.  ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा संदर्भ देत प्राजक्ताच्या आईने प्राजक्ताला विचारले की, आलिया असे काम करू शकते, तर तू का नाही, आणि याच क्षणी प्राजक्ताच्या आईची साधीसुध्दा समोर आली.

About admin

Check Also

तान्हाजीमध्ये चुलत्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या कैलासची पत्नी आहे हि मराठी लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री..बघा फोटो

तान्हाजीमध्ये चुलत्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या कैलासची पत्नी आहे हि मराठी लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री..बघा फोटो

आपण नेहमी बघत आलेलो आहोत, कि बॉलीवूड चे असे बरेच चित्रपट येऊन गेले. ज्यामध्ये आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *